
Uber driver robbed at gunpoint : नगर : पुणे येथील प्रवाशांच्या वेशात आलेल्या तिघांनी उबेर चालकाला बंदुकीचा धाक दाखवून मारहाण (Uber driver robbed at gunpoint) करत त्याची कार, रोख रक्कम आणि सोन्याची अंगठी असा सुमारे पाच लाख ७० हजार ५०० रूपयांचा ऐवज लुटल्याची धक्कादायक घटना एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या (MIDC Police Station) हद्दीतील खोसपुरी (ता. अहिल्यानगर) शिवारात घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल (Case of robbery registered) करण्यात आला आहे.
पुणे ते शेवगाव जाण्यासाठी तीन प्रवाशांना घेतले कारमध्ये
याबाबत विशाल सूर्यकांत कट्टीमनी (वय २५, रा. कोल्हेवाडी, सिंहगड रस्ता, पुणे) यांनी सोमवारी (ता.१५) फिर्याद दिली आहे. फिर्यादी विशाल कट्टीमनी हे टुर्स अँड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय करतात. ते ऑनलाईन उबेर ॲपव्दारे प्रवासी वाहतूक करतात. रविवारी वाकडेवाडी एस.टी. स्टँड, पुणे येथून मळेवाडी (ता. शेवगाव) येथे जाण्यासाठी त्यांनी तीन प्रवाशांना आपल्या कारमध्ये घेतले होते. पहाटे ३.४० वाजण्याच्या सुमारास खोसपुरी शिवारातील रिलॅक्स हॉटेलपासून सुमारे १५० मीटर अंतरावर आल्यानंतर प्रवाशांनी चालकाला लघुशंकेसाठी वाहन थांबविण्यास सांगितले.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
डोक्याला बंदूक लावून लूटले (Uber driver robbed at gunpoint)
चालक पुन्हा वाहनात बसल्यानंतर मागील सीटवर बसलेल्या एका इसमाने त्यांच्या डोक्याला बंदूक लावली. त्याचवेळी दुसऱ्या इसमाने त्यांचे हात पकडले, तर तिसऱ्या इसमाने दोरीने त्यांचे हात बांधले. यानंतर संशयित आरोपींनी चालकाच्या डोक्यात कठीण वस्तूने मारहाण केली आणि बंदुकीचा धाक दाखवत त्यांना वाहनातून खाली ढकलून दिले. त्यानतर आरोपींनी चालकाकडील २० हजार रूपये रोख रक्कम, सुमारे ५० हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी आणि पाच लाख रूपये किमतीची स्विफ्ट डिझायर कार असा एकूण पाच लाख ७० हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल बळजबरीने लुटून पोबारा केला. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी तीन अज्ञात इसमांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


