Suspicion of abducting a minor girl : पाथर्डी तालुक्यातील धक्कादायक प्रकार; दोन अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवल्याचा संशय, पोलिसांकडून शोध सुरू

Suspicion of abducting a minor girl : पाथर्डी तालुक्यातील धक्कादायक प्रकार; दोन अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवल्याचा संशय, पोलिसांकडून शोध सुरू

0

Suspicion of abducting a minor girl : पाथर्डी : पाथर्डी पोलीस ठाण्यात (Pathardi Police Station) अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेल्याच्या (Suspicion of abducting a minor girl) संशयावरून दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून, संबंधित युवकांचा व मुलींचा शोध घेण्याचे काम पोलीस (Police) प्रशासनाकडून सुरू आहे.

अवश्य वाचा : युट्यूबवरील चोरीची क्लृप्ती पाहून उबेर चालकाला लुटले; पोलिसांनी तिघांना घेतले ताब्यात

युवकाने मुलीला फूस लावून नेल्याचा संशय

पहिल्या घटनेत पाथर्डी तालुक्यातील भालगाव परिसरातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी ४ जून रोजी घरातून बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या वडिलांनी दिली आहे. तक्रारीनुसार, मुलगी आणि कर्जत तालुक्यातील एका युवकाचा काही महिन्यांपासून दूरध्वनीद्वारे संपर्क होता. संबंधित मुलगी घरी एकटी असताना ती आढळून न आल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला. त्याचवेळी संबंधित युवकही त्याच्या राहत्या घरी नसल्याचे निदर्शनास आल्याने युवकाने मुलीला फूस लावून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. याप्रकरणी संबंधित युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

युवकाविरुद्ध गुन्हा दाखल(Suspicion of abducting a minor girl)

दुसऱ्या घटनेत पाथर्डी शहर परिसरातील १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी १७ जून रोजी घरातून बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या वडिलांनी दिली आहे. तक्रारीनुसार, मुलगी घरी एकटी असताना ती घरातून निघून गेली. नातेवाईक व परिसरात शोध घेतल्यानंतरही ती मिळून न आल्याने परिसरातील एका युवकावर संशय व्यक्त करण्यात आला आहे. संबंधित युवकही त्याच्या राहत्या घरी नसल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणीही युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी (ता.१७) स्वतंत्र दोन गुन्हे दाखल केले असू शकते, दोन्ही प्रकरणांमध्ये अल्पवयीन मुलींचा शोध घेण्यासाठी पोलीसांकडून विविध पथके कार्यरत करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.