Yuvraj Singh : युवराज सिंग दिसणार कोचच्या भूमिकेत; लवकरच ‘या’ संघाची धुरा हाती घेणार

0
Yuvraj Singh : युवराज सिंग दिसणार कोचच्या भूमिकेत; लवकरच 'या' संघाची धुरा हाती घेणार
Yuvraj Singh : युवराज सिंग दिसणार कोचच्या भूमिकेत; लवकरच 'या' संघाची धुरा हाती घेणार

नगर : आयपीएल (IPL 2026) संपून अवघे काही दिवस उलटले आहेत. अंतिम सामना जिंकून रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरुने (RCB) २०२५ आणि २०२६ ला सलग दोन्ही वर्षी आयपीएलची ट्रॉफी जिंकली आहे. यंदा काही संघानी उत्कृष्ट कामगिरी केली पण काही संघाना खेळ दाखवता आला नाही. त्यामुळे काही संघाना पुढील हंगामासाठी खूप बदल करण्याची गरज आहे. त्यातच आता दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) एक मोठा निर्णय घेतलाय. दिल्ली कॅपिटल्स आपल्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा बदल (Changes in Delhi Capitals’ Coaching Staff) घडवण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे. दिल्ली संघात आता युवराज सिंग (Yuvraj Singh) हा प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

नक्की वाचा : अडवणूक थांबवा,अन्यथा ‘या’ तारखेला पुन्हा आंदोलन;मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा

युवराज सिंग दिल्ली कॅपिटल्सचा प्रशिक्षक होणार (Yuvraj Singh)

भारताचा माजी दिग्गज खेळाडू युवराज सिंगने आयपीएलमध्ये पुनरागमन करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी तो खेळाडू म्हणून नव्हे, तर प्रशिक्षक म्हणून परतणार आहे. माहितीनुसार, युवराज सिंग दिल्ली कॅपिटल्सचा प्रशिक्षक म्हणून आयपीएलमध्ये परतणार आहे. युवराज पहिल्यांदाच प्रशिक्षणात सहभागी होणार आहे. दिल्लीच्या स्टाफमध्ये आधीपासूनच हेमांग बदानी आणि शेन वॉटसनसारखे खेळाडू आहेत. आता, युवराज सिंग दिल्ली कॅपिटल्समध्ये कोचिंग कन्सल्टंट म्हणून सामील होईल. युवराजने अभिषेक शर्मा, प्रभसिमरन सिंग, प्रियांश आर्य आणि अब्दुल समद यांसारख्या खेळाडूंना मार्गदर्शन केले आहे, परंतु आतापर्यंत तो कोणत्याही औपचारिक प्रशिक्षण सेटअपचा भाग नव्हता.

अवश्य वाचा : कोपरगावात विनापरवाना कापूस बियाणे रॅकेट उद्ध्वस्त; पाच जणांवर गुन्हा दाखल

युवराजने तरुण क्रिकेटपटूंसोबत,विशेषतः अभिषेक शर्माचा मार्गदर्शक म्हणून काम केले आहे, ज्याचा अभिषेकला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फायदा झाला आहे. युवी संघात सामील झाल्याने दिल्ली कॅपिटल्सला आनंद झाला आहे. आशिष नेहरा, झहीर खान आणि वीरेंद्र सेहवाग यांच्यासह युवीच्या अनेक माजी आयपीएल सहकाऱ्यांनी आयपीएलमध्ये प्रशिक्षक म्हणून काम केले आहे.

युवराज सिंगचा दिल्लीला फायदा होणार का? (Yuvraj Singh)

दिल्ली कॅपिटल्सने आजपर्यंत आयपीएलचे विजेतेपद जिंकलेले नाही. दिल्ली फ्रँचायझीकडे मोठा अनुभव आहे, परंतु संघाला यश मिळालेले नाही. त्यामुळे, युवराज सिंगला करारबद्ध करणे हा दिल्ली कॅपिटल्ससाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय आहे.