
Local Crime Branch : पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन (Superintendent of Police Mummaka Sudarshan) यांनी स्थानिक गुन्हे शाखेस (Local Crime Branch) जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकांची माहिती काढुन कारवाई करण्याबाबत आदेश दिले आहेत. शुक्रवारी (दि. 19 जून) रात्री पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे (Police Inspector Santosh Mutkule), स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांना राहुरी तालुक्यातील सोनगाव सात्रळ गावचे शिवारात यासिर सादिक तांबोळी रा. सोनगाव सात्रळ ता. राहुरी हा रेशनिंगचा गहु व तांदुळ विक्रीकरीता साई बालाजी फर्निचर शेजारी एका पत्र्याच्या गोडावुनमध्ये साठवुन ठेवले असल्याची गोपनिय माहिती मिळाली. या माहीतीनूसार पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उप निरीक्षक अनंत सालगुडे व पोलीस अंमलदार सुनिल पवार, रिचर्ड गायकवाड, रमीजराजा अतार अशांचे पथक तयार करुन कारवाईच्या सुचना व मार्गदर्शन करुन पथक रवाना केले.
सदरचा गहु व तांदुळ रेशनिंग दुकानातून खरेदी
त्यानंतर पथक नमुद ठिकाणी जावून खात्री करता एक इसम गोडावुनमध्ये बसलेला दिसला. तेव्हा पथकाने छापा टाकुन एका इसमास ताब्यात घेवुन त्याची चाैकशी केली असता त्याने यासिर सादिक तांबोळी वय- 26 वर्षे रा. सोनगाव सात्रळ, ता.राहुरी जि. अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले. ताब्यातील इसमासमक्ष सदर गोडावुनची पाहणी केली असता गोडावुनमध्ये दोन वाहने व गोण्यांमध्ये भरलेले तांदुळ व गहु दिसुन आले. ताब्यातील इसमाकडे सदर गहु व तांदुळ याबाबत विचारपुस करता त्याने सदरचा गहु व तांदुळ हे आजुबाजुचे रेशनिंग दुकानामधुन काळ्याबाजाराने खरेदी केले असल्याचे सांगितले.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
राहुरी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल (Local Crime Branch)
ताब्यातील आरोपीचे व घटनास्थळावरुन 2,09,700/-रु कि.च्या 6990 किलो ग्रॅम वजाचे गव्हाणे भरलेले 121 गोण्या, 2,93,000/-रु कि.च्या 5860 किलो ग्रॅम वजनाचे तांदुळाने भरलेल्या 117 गोण्या, 7,00,000/-रु कि.चे दोन वाहने असा एकुण 12,02,700/- रू किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ताब्यातील आरोपीस मुद्देमालासह राहुरी पोलीस स्टेशन येथे हजर केले असुन वरील आरोपीविरूध्द राहुरी पोलीस स्टेशन गुरनं 713/2026 जिवनावश्यक वस्तु अधिनियम कलम 3 व 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास राहुरी पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कारवाई मा. श्री. मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी केलेली आहे.


