Pawanraje Nimbalkar Murder Case : पवनराजे हत्याकांडात अण्णा हजारेंची साक्ष, कसा आला संबंध, हजारेंनी काय सांगितलं?

Pawanraje Nimbalkar Murder Case : पवनराजे हत्याकांडात अण्णा हजारेंची साक्ष, कसा आला संबंध, हजारेंनी काय सांगितलं?

0
Pawanraje Nimbalkar Murder Case : पवनराजे हत्याकांडात अण्णा हजारेंची साक्ष, कसा आला संबंध, हजारेंनी काय सांगितलं?
Pawanraje Nimbalkar Murder Case : पवनराजे हत्याकांडात अण्णा हजारेंची साक्ष, कसा आला संबंध, हजारेंनी काय सांगितलं?

Pawanraje Nimbalkar Murder Case : नगर : धाराशिव जिल्ह्यातील काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर (Pawanraje Nimbalkar Murder Case) व त्यांचे चालक समद काझी यांच्या हत्या प्रकरणातून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी गृहराज्यमंत्री पद्मसिंह पाटील (Padmasinh Patil) यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. जून २००६ मध्ये नवी मुंबईतील कळंबोली येथे गोळ्या झाडून हत्या झाल्यानंतर तब्बल 20 वर्षांनी या प्रकरणाचा निकाल आला आहे. यात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांचीही साक्ष झाली होती. हजारे यांच्या आंदोलनाचा संबंध यात होता. त्यामुळे हजारे यांची साक्ष महत्वाची मानली गेली होती.

अण्णा हजारे यांचा संबंध कसा आला

त्या काळात अण्णा हजारे यांची भष्टाचाराच्या विरोधात आंदोलने जोरात सुरू होती. काही मंत्र्यांविरूद्ध हजारे यांनी आरोप करून उपोषण केले होते. त्यावेळी धाराशीव जिल्ह्यात चुलत भाऊ असलेला पद्मसिंह पाटील आणि पवनराजे निंबाळकर यांच्यात वाद पेटला होता. त्यामुळे पवनराजे यांनी पाटील यांच्या विरोधातील काही प्रकरणे हजारे यांना आणून दिली होती. त्याआधारे हजारे यांनी पाटील यांच्याविरोधातही आंदोलन सुरू केले. पद्मसिंह पाटल मंत्री असताना 2005 मध्ये झालेल्या तेरणा स्ट्रस्ट सह तेरणा कारखाना साखर घोटाळा त्याचबरोबर कारगील निधी यामध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप हजारे यांनी केला होता. पाटील हे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नातेवाईक असल्याने त्यांना पाठीशी घातले जात असल्याचा आरोपही हजारे करीत होते.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

पारनेर पोलिस ठाण्यात तक्रार(Pawanraje Nimbalkar Murder Case)

त्यानंतर जेव्हा पवनराजे यांची मुंबईत हत्या झाली, त्यावेळी यात पकडला गेलेला आरोपी पारसमल जैन याने आपल्या जबाबात पाटील यांच्यासोबत हजारे यांना मारण्यासाठीही सुपारी दिल्याचा उल्लेख केला. हजारे यांना आलेल्या धमकीसंबंधी त्यांनी पारनेर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.
काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर यांच्या हत्या प्रकरणात जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांना सरकारी साक्षीदार करण्यात यावे, अशी मागणी करत निंबाळकर यांच्या पत्नी आनंदीदेवी निंबाळकर यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली. अण्णा हजारे यांची साक्ष या खटल्यात महत्त्वपूर्ण असून यातून काहीतरी नवी माहिती मिळू शकते, असा दावा आनंदीदेवी निंबाळकर यांनी या याचिकेत केला. त्यानंतर हजारे यांना साक्षीदार करण्यात आले.

अण्णा हजारे यांनी कोर्टात काय सांगितले…

सुमारे सात वर्षांपूर्वी हजारे यांची साक्ष नोंदविण्यात आली. त्यात हजारे यांनी यातील मुख्य आरोपी पद्मसिंह पाटील यांना लोकप्रतिनिधी म्हणून ओळखत असल्याचे सांगितले. पाटील यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होते. त्याच प्रकरणांच्या चौकशीसाठी मी आंदोलन केले होते. यानंतर सुप्रीम कोर्टाचे निवृत्त न्यायाधीश पीबी सावंत यांच्या नेतृत्वाखाली चौकशी समिती स्थापन झाली होती. त्यानंतर जेव्हा पाटील यांची हत्या झाली, त्यावेळी प्रसार माध्यमांतून मला माहिती मिळाली की, पवनराजे निंबाळकर यांच्या मारेकऱ्यांना माझ्याही हत्येची सुपारी देण्यात आली होती. त्यावर मी पारनेर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती. यासंदर्भात सरकारलाही पत्र पाठवले होते. परंतु, माझ्या तक्रारीची दखल घेण्यात आली नाही.” अशी साक्ष हजारे यांनी त्यावेळी न्यायालयात दिली होती.

या खटल्याचा निकाल देताना न्यायालयाने माफीचा साक्षिदार आणि अन्य साक्षीही पुरेशा नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे सबळ पुराव्याअभावी आरोपींची सुटका करण्यात आली आहे.