Knife Attack :नगर : शहरातील गांधी मैदान परिसरात एका तरूणावर चाकूने हल्ला (Knife Attack) करून गंभीर जखमी (Seriously injured) केल्याची घटना घडली आहे. काशिफ जुबेर शेख (वय ३०, रा. आशा टॉकिज, तख्ती दरवाजा, घुमरे गल्ली) असे जखमी तरूणाचे नाव असून त्यांच्यावर येथील जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. उपचारादरम्यान दिलेल्या जबाबावरून दोघांविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
पोटावर वार केल्याचा आरोप (Knife Attack)
ऋषी मोरे (रा. केडगाव) व आशिष ऊर्फ सनी अनिल शिंदे (रा. गांधी मैदान परिसर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. फिर्यादी काशिफ शेख यांनी दिलेल्या जबाबानुसार, गुरूवारी जेवण केल्यानंतर गांधी मैदान परिसरात फिरण्यासाठी गेले होते. त्यावेळी तेथे त्यांचे परिचित मित्र बसलेले होते. यामध्ये ऋषी मोरे आणि आशिष ऊर्फ सनी शिंदे यांचा समावेश होता. काशिफ शेख हे त्यांच्या जवळ गेल्यानंतर ऋषी मोरे याने कारण नसताना त्यांच्याशी झटापट केली. तू असे काय करतो, काय झाले? असे विचारत असतानाच ऋषी मोरे याने कमरेला लावलेला चाकू काढून त्यांच्या पोटावर वार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. अचानक झालेल्या या हल्ल्यानंतर तेथे उपस्थित असलेला सनी शिंदे घटनास्थळावरून पळून गेला असे फिर्यादीत म्हटले आहे.



