Action against vehicles : श्रीगोंदा पोलिसांची सलग चौथ्या दिवशी वाहनांवर दंडात्मक कारवाई

0
Action against vehicles : श्रीगोंदा पोलिसांची सलग चौथ्या दिवशी वाहनांवर दंडात्मक कारवाई
Action against vehicles : श्रीगोंदा पोलिसांची सलग चौथ्या दिवशी वाहनांवर दंडात्मक कारवाई

Action against vehicles : श्रीगोंदा : शहर व परिसरात विना नंबर प्लेट तसेच आवश्यक कागदपत्रांशिवाय फिरणाऱ्या दुचाकी वाहनांविरोधात श्रीगोंदा पोलिसांनी विशेष मोहीम राबवत मोठी कारवाई केली आहे. चोरीच्या वाहनांचा शोध घेण्यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आली असून चार दिवसांत तब्बल १८७ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

हेही वाचा : परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना अहिल्यानगरच्या कृषिकन्येने दिले योगाचे धडे; प्रियंका शिंदे हिची योग क्षेत्रात मोठी झेप

विशेष तपासणी मोहीम

पोलिसांना गोपनीय माहितीदारामार्फत माहिती मिळाली होती की, काही आरोपी चोरीच्या वाहनांवरील नंबर प्लेट काढून त्या वाहनांचा वापर करत आहेत. त्यानुसार दिनांक १७ जून ते २० जून या कालावधीत श्रीगोंदा शहरात विशेष तपास मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान विना नंबर प्लेट असलेल्या दुचाकी वाहनांची तपासणी करण्यात आली. ज्या वाहनांवर नंबर प्लेट नव्हती अशी एकूण १८७ वाहने पोलीस स्टेशन येथे आणण्यात आली. वाहनांचे आरसी बुक, चेसिस नंबर, इंजिन नंबर तसेच वाहन परवाना यांची पडताळणी करण्यात आली.

नक्की पहा : एक हजार विद्यार्थ्यांची मानवी साखळी करत योग दिन साजरा

दंडात्मक कारवाई (Action against vehicles)

आवश्यक कागदपत्रांची खात्री झाल्यानंतर वाहनांना जागीच नंबर प्लेट बसवून दंडात्मक कारवाई करण्यात आली व १६९ वाहने सोडून देण्यात आली. मात्र, उर्वरित १८ वाहनधारकांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न केल्याने संबंधित वाहने पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्यात आली आहेत. १७जून रोजी ५६ वाहनांवर कारवाई, १ लाख ८ हजार ५०० रुपयांचा दंड, १८ जून रोजी ४७ वाहनांवर कारवाई, १ लाख १० हजारांचा दंड, १९ जून रोजी ५४ वाहनांवर कारवाई, १ लाख ५ हजार रुपयांचा दंड तर २० जून रोजी ३० वाहनांवर कारवाई, ३० हजार रुपयांचा दंड असा मिळून एकूण एकूण १८७वाहनांवर कारवाई करून ३ लाख ५० हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.