Crime : ढवळगाव शिवारात गावठी कट्टा बाळगणारे दोन आरोपी बेलवंडी पोलिसांकडून अटक

0
Crime : ढवळगाव शिवारात गावठी कट्टा बाळगणारे दोन आरोपी बेलवंडी पोलिसांकडून अटक
Crime : ढवळगाव शिवारात गावठी कट्टा बाळगणारे दोन आरोपी बेलवंडी पोलिसांकडून अटक

Crime : नगर : श्रीगोंदा तालुक्यातील ढवळगाव शिवार परिसरात गावठी कट्टा विक्रीसाठी आणणाऱ्या दोन आरोपींना बेलवंडी पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. आरोपींकडून विनापरवाना गावठी कट्टा व जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

हेही वाचा : परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना अहिल्यानगरच्या कृषिकन्येने दिले योगाचे धडे; प्रियंका शिंदे हिची योग क्षेत्रात मोठी झेप

ढवळगाव शिवारात सापळा

याबाबत माहिती अशी की दि. १९ जून रोजी बेलवंडी पोलीस ठाणे हद्दीतील ढवळगाव शिवारात काही इसम गावठी कट्टा विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार प्रभारी पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर व त्यांच्या पथकाने ढवळगाव शिवारातील हॉटेल रिलॅक्स परिसरात सापळा रचला. संशयित आरोपींची माहिती घेतली असता संशयित आरोपींकडे गावठी कट्टा व जिवंत राऊंड असल्याची खात्री होताच पोलिसांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांची चाहूल लागताच संबंधित दोघे आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले.

हेही पहा : एक हजार विद्यार्थ्यांची मानवी साखळी करत योग दिन साजरा

विनापरवाना गावठी कट्टा (Crime)

पोलिसांनी पाठलाग करून त्यांना शिताफीने ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता आरोपी सचिन विलास शिंदे (वय ३५, रा. निंबवी, ता. श्रीगोंदा) याच्या ताब्यात विनापरवाना गावठी कट्टा आढळून आला. तसेच आरोपी दीपक सिताराम शिंदे (रा. ढवळगाव) याच्याकडून दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. पोलिसांनी आरोपींकडे चौकशी केली असता त्यांनी सदर गावठी कट्टा हा तुषार तांबे याच्याकडून विक्रीसाठी घेतल्याची कबुली दिली. याप्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियम कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास प्रभारी पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर करत आहेत.