Fraud : सिसपे फसवणूक प्रकरणातील मुख्य आरोपी नवनाथ औताडेचा अंतरिम जामीन फेटाळला; गुंतवणूकदारांना दिलासा

0
सिसपे फसवणूक प्रकरणातील मुख्य आरोपी नवनाथ औताडेचा अंतरिम जामीन फेटाळला; गुंतवणूकदारांना दिलासा
सिसपे फसवणूक प्रकरणातील मुख्य आरोपी नवनाथ औताडेचा अंतरिम जामीन फेटाळला; गुंतवणूकदारांना दिलासा

Fraud : नगर : लाखाची गुंतवणूक करा आणि भरघोस परतावा मिळवा या आमिषाला भुलवून श्रीगोंदा-पारनेर तालुक्यातील शेकडो नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या सिस-पे कंपनी प्रकरणात महत्त्वाची घडामोड घडली आहे. या प्रकरणातील प्रमुख आरोपी व कंपनीचे संचालक नवनाथ औताडेचा तात्पुरता अंतरिम जामीन जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे.

हेही वाचा : परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना अहिल्यानगरच्या कृषिकन्येने दिले योगाचे धडे; प्रियंका शिंदे हिची योग क्षेत्रात मोठी झेप

अटकेचा मार्ग मोकळा

या निर्णयामुळे औताडे याच्या अटकेचा मार्ग मोकळा झाला असून तपास यंत्रणांना त्यांच्याविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई करण्यासाठी बळ मिळाले आहे. या प्रकरणात यापूर्वी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर काही आरोपींना अटक करण्यात आली होती. सध्या ते जामिनावर बाहेर आहेत.

नक्की पहा : एक हजार विद्यार्थ्यांची मानवी साखळी करत योग दिन साजरा

अंतरिम जामीन अर्ज फेटाळला (Fraud)

दरम्यान या खटल्यात सरकारी वकील केदार केसकर यांनी प्रभावीपणे बाजू मांडल्यानेच अंतरिम जामीन अर्ज फेटाळला गेल्याची भावना गुंतवणूकदारांमध्ये आहे. प्रकरणातील कारवाईचे श्रेय घेण्याचा प्रयत्न काहींकडून होत असून न्यायालयीन लढाईत वकील केसकर यांचे योगदान महत्त्वाचे आहे, त्यामुळे कोणत्याही अफवा किंवा गैरप्रचाराला बळी पडू नये, असे मत फसवणूकग्रस्त गुंतवणूकदारांनी व्यक्त केले. आता मुख्य आरोपीला भारतात आणण्याच्या प्रक्रियेला किती वेग येतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.