
Crackdown on gambling dens : नगर : अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधातील मोहिमेला वेग देत स्थानिक गुन्हे शाखे(Local Crime Branch)ने जुगार अड्ड्यांवर मोठी कारवाई (Crackdown on Gambling Dens) केली आहे. जिल्ह्यातील विविध ठिकाणी टाकलेल्या छाप्यांमध्ये ८ जुगार अड्ड्यांवर कारवाई करण्यात आली असून १ लाख ६५ हजार २६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच संबंधितांविरुद्ध पोलीस ठाण्यात ८ गुन्हे दाखल (Cases registered) करण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील अवैध व्यवसायांवर कारवाईचे निर्देश
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुरकुटे यांनी विशेष पथके तयार करून जिल्ह्यातील अवैध व्यवसायांची माहिती संकलित करण्यासह कारवाईचे निर्देश दिले होते. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक दिपक मेढे, राजेंद्र वाघ तसेच स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची दोन पथके तयार करण्यात आली.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
अनेक ठिकाणी एकाच वेळी छापेमारी (Crackdown on Gambling Dens)
२२ जून २०२६ रोजी या पथकांनी श्रीरामपूर शहर, कोतवाली आणि तोफखाना पोलीस ठाण्यांच्या हद्दीत एकाच वेळी छापेमारी केली. या कारवाईत अवैध जुगार सुरू असल्याचे आढळून आल्याने संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.
ही कारवाई श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे हद्दीत ६ गुन्हे, १ लाख ६१ हजार ८८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. कोतवाली पोलीस ठाणे: १ गुन्हा, १ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला तर तोफखाना पोलीस ठाणे : १ गुन्हा, १ हजार ९८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याबात एकूण ८ गुन्हे दाखल करत १ लाख ६५ हजार २६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली.


