
Warning of a protest : पाथर्डी : येथील धामणगाव परिसरातील किरण अप्पासाहेब काकडे यांच्या खून प्रकरणातील (Murder Case) काही आरोपींना आर्थिक तडजोड करून सोडून देण्यात आल्याचा गंभीर आरोप करत पोलीस निरीक्षक आनंद कोकरे (Anand Kokre) यांची खातेनिहाय चौकशी करून त्यांना सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत किसन महादेव आव्हाड (रा. जांभळी, ता. पाथर्डी) यांनी पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्याकडे निवेदन सादर केले असून मागण्या मान्य न झाल्यास २७ जून रोजी शेवगाव येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयासमोर बैठ सत्याग्रह व घंटानाद आंदोलन करण्याचा इशारा (Warning of a protest) दिला आहे.
नक्की वाचा : मुळा सहकारी साखर कारखान्यावर गडाखांचे वर्चस्व अबाधित; २१ पैकी १८ जागा बिनविरोध
१७ ते १८ जण सहभागी असल्याचा दावा
निवेदनात म्हटले आहे की, १७ जूनच्या रात्री ते १८ जूनच्या सकाळीदरम्यान धामणगाव येथील किरण काकडे यांचा काही जणांनी हत्याराने मारहाण करून खून केला. या प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चार आरोपींना अटक केली असली, तरी प्रत्यक्ष घटनेत १७ ते १८ जण सहभागी असल्याचे फुटेजमध्ये स्पष्ट दिसत असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (एलसीबी) सीसीटीव्हीच्या आधारे आणखी चार संशयितांना ताब्यात घेऊन पाथर्डी पोलिसांच्या स्वाधीन केले होते. मात्र त्यानंतर संबंधित आरोपींना आर्थिक तडजोडीतून सोडून देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
चौकशी पूर्ण होईपर्यंत पदावरून दूर करण्याची मागणी (Warning of a protest)
यामध्ये काही राजकीय पदाधिकारी व मध्यस्थांची भूमिका असल्याचाही दावा निवेदनात करण्यात आला आहे.निवेदनाद्वारे उर्वरित आरोपींना तत्काळ अटक करणे, घटनेशी संबंधित सर्व सीसीटीव्ही फुटेज जतन करणे, पोलीस निरीक्षकांच्या मोबाईल कॉल डिटेल रेकॉर्डची (सीडीआर) चौकशी करणे, पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेज तपासणे तसेच संपूर्ण प्रकरणाचा तपास वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्यांमार्फत अथवा सीआयडीकडून करण्याची मागणी करण्यात आली आहे.खून प्रकरणातील प्रत्यक्ष आरोपींना मदत केल्याचा आरोप करत पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत पदावरून दूर करावे व त्यांच्याविरोधातही कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. अन्यथा २७ जून रोजी आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.


