Oath : प्राजक्त तनपुरे यांनी घेतली आमदारकीची शपथ

0
Oath : प्राजक्त तनपुरे यांनी घेतली आमदारकीची शपथ
Oath : प्राजक्त तनपुरे यांनी घेतली आमदारकीची शपथ

Oath : नगर : अहिल्यानगर विधानपरिषदेचे नवनिर्वाचित आमदार प्राजक्त तनपुरे यांनी विधान परिषद सदस्यत्वाची (MLC) अधिकृतपणे शपथ घेतली आहे. महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान मुंबईत विधान भवनात त्यांचा शपथविधी सोहळा पार पडला.

हेही वाचा : अहिल्यानगरमध्ये जुगार अड्ड्यांवर धडक कारवाई; ८ गुन्हे दाखल, १.६५ लाखांचा मुद्देमाल जप्त

शपथविधी संपन्न

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधानपरिषद निवडणुकांचा (Election) निकाल 22 जून रोजी जाहीर करण्यात आला. त्यामध्ये, 11 पैकी 10 जागा जिंकत महायुतीने दणदणीत विजय मिळवला. आज (ता. २३) विधानपरिषदेत त्यांचा आमदार (MLC) म्हणून शपथविधीही संपन्न झाला.

नक्की पहा : पाथर्डीतील जुन्या बसस्थानकात दोन वळूंची झुंज; प्रवाशांची उडाली तारांबळ

यांचाही शपथविधी (Oath)

विधानपरिषद सभागृहात झालेल्या शपथविधी कार्यक्रमात विधानपरिषद निवडणुकांमध्ये निवडून आलेल्या काही सदस्यांनाही आज शपथ देण्यात आली. त्यामध्ये, खासदार सुप्रिया सुळेंचे जावई अरुण लखानी यांनीही शपथ घेतली. कालच निवडून आलेल्या नवनिर्वाचित सदस्यांपैकी अनेकजणांनी आज शपथ घेतली. प्राजक्त तनपुरे यांच्यासह पुण्याचे विक्रम काकडे, सोलापूरचे राजेंद्र राऊत, रत्नागिरीचे अनिकेत तटकरे, साताऱ्याचे धैर्यशील कदम यांच्यासह एकूण 16 आमदारांचा शपथविधी संपन्न झाला.