PM Kisan : नगर : अहिल्यानगर जिल्ह्यासह देशभरातील पीएम किसानच्या लाभार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील ५ लाख ६६ हजारांहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात केंद्र सरकारच्या किसान सन्मान निधी योजनेचा २३ वा हप्ता जमा करण्यात आला आहे. या माध्यमातून तब्बल १११ कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी जिल्ह्यात पोहोचला आहे.
हेही वाचा : अहिल्यानगरमध्ये जुगार अड्ड्यांवर धडक कारवाई; ८ गुन्हे दाखल, १.६५ लाखांचा मुद्देमाल जप्त
थेट बँक खात्यात रक्कम
संगमनेर तालुक्यात सर्वाधिक ५९ हजारांहून अधिक शेतकऱ्यांना जवळपास १२ कोटी रुपयांचे अनुदान मिळाले आहे. नेवासा, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, शेवगाव आणि राहुरी या तालुक्यांतील हजारो शेतकऱ्यांनाही मोठा लाभ झाला आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना थेट बँक खात्यात आर्थिक मदत दिली जाते.
नक्की पहा : पाथर्डीतील जुन्या बसस्थानकात दोन वळूंची झुंज; प्रवाशांची उडाली तारांबळ
दुहेरी लाभ (PM Kisan)
या योजनेमुळे शेतीच्या हंगामी खर्चासाठी आणि दैनंदिन गरजांसाठी शेतकऱ्यांना आधार मिळतो. दरम्यान, केंद्राच्या किसान सन्मान निधीबरोबरच राज्य सरकारची नमो शेतकरी महासन्मान निधी योजना देखील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची ठरत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दुहेरी आर्थिक मदतीचा लाभ मिळत आहे.



