Appeal : श्रीगोंद्याच्या नागरिकांना पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन; नगराध्यक्षांसह नगरसेवकांची घोड धरणावर प्रत्यक्ष पाहणी

0
Appeal : श्रीगोंद्याच्या नागरिकांना पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन; नगराध्यक्षांसह नगरसेवकांची घोड धरणावर प्रत्यक्ष पाहणी
Appeal : श्रीगोंद्याच्या नागरिकांना पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन; नगराध्यक्षांसह नगरसेवकांची घोड धरणावर प्रत्यक्ष पाहणी

Appeal : नगर : श्रीगोंदा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या घोड धरण (चिंचणीगाव) परिसरात प्रत्यक्ष जाऊन पाहणी करण्यात आली. यावेळी श्रीगोंदा नगर परिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सुनिता संतोष खेतमाळीस, उपाध्यक्षा अलका सुनील अनभुले, नगरसेवक एम. डी. शिंदे, प्रशांत गोरे, शहाजी खेतमाळीस तसेच नगरसेविका अश्विनी प्रवीण काळे, मीरा शिंदे, चांदणी दिलीप खेतमाळीस, कोमल विकास बोरुडे, मनिषा विठ्ठल आनंदकर, सोनाली सागर गोरे, अनिता अनिल घोडके, संजय खेतमाळीस, राजेंद्र उकांडे, प्रविण काळे उपस्थित होते.

हेही वाचा : हरेगावच्या मळ्यात आता बॉम्ब गोळ्यांची ‘शेती’, शिर्डीनंतर श्रीरामपूरही ‘डिफेन्स हब’

उपाययोजनांचा आढावा

या पाहणीवेळी पाणीसाठ्याची सद्यस्थिती, आगामी काळातील पाणी उपलब्धता तसेच आवश्यक उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. पाऊस लांबण्याची किंवा अपेक्षेपेक्षा कमी होण्याची शक्यता लक्षात घेता उपलब्ध पाणीसाठा मर्यादित होत असल्याने नागरिकांनी पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने व जबाबदारीने करावा, असे आवाहन नगराध्यक्षा व नगरसेवकांनी केले.

नक्की पहा : प्रियकराच्या मदतीनं होणाऱ्या नवऱ्याची हत्या, लोहगडावर केतन अग्रवालचा सियानं कसा केला घात?

पंपाची दुरुस्ती आवश्यक (Appeal)

पाहणीदरम्यान धरणावरील पंपांचे तातडीने देखभाल व दुरुस्ती (मेंटेनन्स) करणे आवश्यक असल्याचे निदर्शनास आले. यासंदर्भात आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. यावेळी नगराध्यक्षा, उपाध्यक्षा व सर्व नगरसेवकांनी “श्रीगोंदा शहराच्या पाणीपुरवठ्यात कोणत्याही परिस्थितीत कमतरता येऊ देणार नाही, यासाठी नगर परिषद सर्वतोपरी प्रयत्नशील राहील,” अशी ग्वाही दिली.