
Upper Tehsil Office : नगर : प्रशासकीय कामकाजात सुलभता आणणे, गतिमानता वाढविणे तसेच नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने नेवासा तालुक्यातील (Nevasa Taluka) घोडेगाव येथे नवीन अपर तहसील कार्यालय (Upper Tehsil Office) स्थापन करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. प्रस्तावित अपर तहसील कार्यालयाच्या निर्मितीबाबत तसेच क्षेत्र पुनर्रचनेबाबत तालुक्यातील स्थानिक नागरिक व संस्थांनी त्यांच्या लेखी हरकती (Objection) अथवा सूचना ता. ८ जुलै पर्यंत तहसील कार्यालय, नेवासा येथे सादर कराव्यात, असे आवाहन उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांनी केले आहे.
नक्की वाचा : गावठी कट्टा व जिवंत काडतुसे बाळगणारा आरोपी जेरबंद; पाथर्डी पोलिसांची कारवाई
या महसूल मंडळांचा समावेश
प्रस्तावानुसार अपर तहसील कार्यालयाचे मुख्यालय घोडेगाव येथे राहणार असून त्यामध्ये चांदा, सोनई, घोडेगाव, वडाळा बहिरोबा आणि टेंभुर्णी या महसूल मंडळांचा समावेश करण्यात येणार आहे. या मंडळांतील सर्व गावे प्रस्तावित अपर तहसील कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात समाविष्ट होणार आहेत. या प्रस्तावाबाबत संबंधित क्षेत्रातील नागरिक, संस्था तसेच इतर संबंधित घटकांना काही हरकती अथवा सूचना असल्यास त्या विहित अटी व शर्तींच्या अधीन राहून सादर करता येणार आहेत.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
अभिप्रायासह अहवाल शासनाकडे सादर करण्यात येणार (Upper Tehsil Office)
प्राप्त हरकती व सूचनांचा विचार करून अंतिम निर्णय घेण्यात येईल. नागरिकांनी त्यांच्या हरकती व सूचना स्पष्ट कारणांसह तसेच आवश्यक पुराव्यांसह विहित मुदतीत सादर कराव्यात. मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या हरकती व सूचनांचा विचार करण्यात येणार नाही. प्राप्त सर्व हरकती व सूचनांचे दैनंदिन संकलन करून स्वयंस्पष्ट अभिप्रायासह अहवाल शासनाकडे सादर करण्यात येणार असल्याचेही उपविभागीय अधिकारी पाटील यांनी सांगितले.


