Accused Apprehended : गावठी कट्टा व जिवंत काडतुसे बाळगणारा आरोपी जेरबंद; पाथर्डी पोलिसांची कारवाई

सापळा रचून संशयित ताब्यात

0
Accused Apprehended : गावठी कट्टा व जिवंत काडतुसे बाळगणारा आरोपी जेरबंद; पाथर्डी पोलिसांची कारवाई
Accused Apprehended : गावठी कट्टा व जिवंत काडतुसे बाळगणारा आरोपी जेरबंद; पाथर्डी पोलिसांची कारवाई

Accused Apprehended : पाथर्डी : शहरात गावठी कट्टा बाळगून फिरणाऱ्या एका आरोपीस (Accused Apprehended) पाथर्डी पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून एक गावठी कट्टा (Gavathi Katta) व दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. या कारवाईत एकूण २६ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन (Mummaka Sudarshan) यांच्या आदेशानुसार पाथर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या नेतृत्वाखाली अवैध शस्त्रधारकांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.

नक्की वाचा : आता प्रत्येक पोलीस ठाण्यात ‘अमली पदार्थविरोधी स्वतंत्र युनिट’; आमदार खताळ यांच्या मागणीला यश

सापळा रचून संशयित ताब्यात

त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक विशाल लहाने, हेडकॉन्स्टेबल बाबासाहेब बडे, ज्ञानेश्वर इलग, सागर बुधवंत, इजाज सय्यद व संजय जाधव यांचे पथक गस्त घालत असताना त्यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, रेकॉर्डवरील गुन्हेगार असलेला आरोपी शिवराज उर्फ बज्या हरिश्चंद्र मरकड (रा. निवडुंगे, ता. पाथर्डी) हा पाथर्डी शहरातील संस्कार भवन परिसरात गावठी कट्टा घेऊन फिरत आहे.माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून संशयितास ताब्यात घेतले. पोलिसांची चाहूल लागताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला; मात्र पथकाने शिताफीने त्याला पकडले. 

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

गुन्हा दाखल (Accused Apprehended)

झडतीदरम्यान त्याच्याकडून २५ हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा आणि १ हजार ६०० रुपये किमतीची दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर इलग यांच्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विशाल लहाने करीत आहेत.ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी निरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.