Artist : राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजनेसाठी ३१ जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

0
Artist : राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजनेसाठी ३१ जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
Artist : राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजनेसाठी ३१ जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

Artist : नगर : राज्यातील ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांना आर्थिक आधार व सन्मान देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजनेअंतर्गत पात्र साहित्यिक व कलाकारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. जिल्ह्यातील पात्र ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी १ जुलै ते ३१ जुलै २०२६ दरम्यान अर्ज सादर करण्याचे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवड समितीचे सदस्य सचिव दादासाहेब गुंजाळ यांनी केले आहे.

हेही वाचा : आनंदवार्ता! ४० वारकरी एकत्र आल्यास गावातूनच सुटणार ‘लालपरी’

जाणून घ्या अटी

योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वय ५० वर्षांपेक्षा अधिक असणे आवश्यक आहे. दिव्यांग कलाकारांसाठी वयोमर्यादेत १० वर्षांची शिथिलता देण्यात आली असून त्यांच्यासाठी किमान वय ४० वर्षे निश्चित करण्यात आले आहे. अर्जदाराचे कला अथवा साहित्य क्षेत्रातील योगदान किमान १५ वर्षांचे असावे तसेच त्यांचे कार्य सातत्यपूर्ण, दर्जेदार व समाजोपयोगी स्वरूपाचे असणे आवश्यक आहे. वयोवृद्ध, विधवा, परित्यक्ता व दिव्यांग कलाकारांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

नक्की पहा : १ जुलैपासून खिशाला कात्री; रेल्वे तिकिटांपासून LPG पर्यंत बदलणार ७ नियम

इथे करा अर्ज (Artist)

कलाकार अथवा साहित्यिकाच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ६० हजार रुपयांपेक्षा अधिक नसावे. अर्जदाराची उपजीविका प्रामुख्याने कलाक्षेत्रावर अवलंबून असावी. तसेच केंद्र किंवा राज्य शासनाच्या इतर कोणत्याही नियमित मासिक पेन्शन योजनेचा लाभ घेत असलेल्या व्यक्ती या योजनेसाठी पात्र राहणार नाहीत. अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असणे बंधनकारक आहे. इच्छुक कलाकार व साहित्यिकांनी https://aaplesarkar.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करावेत. करण्यात येणार नाही. ऑफलाइन अर्ज स्वीकारले जाणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.