Sharad Pawar : शरद पवारांचा विखेंच्या बालेकिल्ल्यातून राजकीय संदेश?राजकीय भाष्य टाळले, पण त्या कृतीने वेधले लक्ष

Sharad Pawar : शरद पवारांचा विखेंच्या बालेकिल्ल्यातून राजकीय संदेश?राजकीय भाष्य टाळले, पण त्या कृतीने वेधले लक्ष

0

Sharad Pawar : नगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) बुधवारी अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रवरानगर (लोणी) येथे आले होते. रयत शिक्षण संस्थेचा (Rayat Shikshan Sanstha) शैक्षणिक स्वरुपाचा कार्यक्रम होता. त्यामुळे यात राजकीय भाष्य झाले नाही, मात्र पवार यांनी नेहमीप्रमाणे आपल्या कृतीतून राजकीय संदेश देण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांचे गाव आणि बालेकिल्ला असलेल्या प्रवरानगरमध्ये जाताना पवारांनी विखे पाटील यांच्या कट्टर विरोधकांना सोबत घेतले. त्यांच्या पाठीशी आपण आहोत, असाच संदेश देण्याचा जणू प्रयत्न केला.

Sharad Pawar : शरद पवारांचा विखेंच्या बालेकिल्ल्यातून राजकीय संदेश?राजकीय भाष्य टाळले, पण त्या कृतीने वेधले लक्ष
Sharad Pawar : शरद पवारांचा विखेंच्या बालेकिल्ल्यातून राजकीय संदेश?राजकीय भाष्य टाळले, पण त्या कृतीने वेधले लक्ष

पवार यांनी सांगितल्या या भागातील लहानपणीच्या आठवणी

या दौऱ्यात पवारांसोबत माजी मंत्री बाळासाहेब थोरात, खासदार निलेश लंके, विखे पाटील यांच्याविरोधात विधान सभेची निवडणूक लढविलेल्या काँग्रेसच्या प्रभावती घोगरे य़ांच्यासह इतर विरोधी नेते होते. खरे तर पवार लोणी येथे आल्यावर जिल्ह्याच्या राजकारणावर किंवा एकूणच राजकारणावरही बोलतील, अशी अपेक्षा होती. मात्र, तसे झाले नाही. उलट पवार यांनी या भागातील आपल्या लहानपणीच्या आठवणी सांगितल्या. त्यावेळी दिवंगत नेते पदमश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी त्यांना कसे सहकार्य केले होते, याचे किस्सेही पवार यांनी सांगितले.

Sharad Pawar : शरद पवारांचा विखेंच्या बालेकिल्ल्यातून राजकीय संदेश?राजकीय भाष्य टाळले, पण त्या कृतीने वेधले लक्ष
Sharad Pawar : शरद पवारांचा विखेंच्या बालेकिल्ल्यातून राजकीय संदेश?राजकीय भाष्य टाळले, पण त्या कृतीने वेधले लक्ष

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

विखेंच्या गावातच पवारांच्या नावाचे सभागृह (Sharad Pawar)

आपल्या आयुष्यातील पहिला मोर्चा आपण प्रवरानगरमध्ये काढला होता. गोवामुक्ती संग्रामात सहभागी होत शाळा आणि परिसरात बंद पाळण्यात आला होता. प्रवरा साखर कारखानाही बंद करण्यासाठी गेलो होतो, असे किस्से पवार यांनी सांगितले. ज्या कार्यक्रमाला पवार आले होते, त्या शाळेतच त्यांच्याच नावाचे सभागृह उभारण्यात येणार आहे. त्याचे भूमिपूजनही पवार यांच्या हस्तेच झाले. विखेंच्या गावातच पवारांच्या नावाचे सभागृह होणार आहे, ही या दौऱ्यातील आणखी एक महत्त्वाची बाब ठरते. राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या हे महत्त्वाचे मानले जात आहे.
राज्याच्या राजकारणात अनेक दशकांपासून पवार आणि विखे-पाटील या दोन प्रवाहांमध्ये स्पर्धा आणि वैचारिक संघर्ष राहिला आहे. त्यामुळे पवारांच्या भावनिक आठवणींसोबतच त्यांच्या राजकीय हालचालींची चर्चा अधिक रंगली आहे. जिल्ह्यातील बहुतांश नेते सत्तेच्या बाजूला गेलेले असताना विरोधात उरलेल्या नेत्यांना बळ देण्याचा प्रयत्न पवार यांच्याकडून झाल्याचे दिसून येते. राहुरीतही त्यांचे स्वागत झाले. आमदार प्राजक्त तनपुरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्याच्या पार्श्वभूमीवर पवारांचे राहुरीतील स्वागत लक्षवेधक ठरते.