FDA : राहाता : शिर्डी शहरात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या (FDA) अन्नभेसळ प्रतिबंधक पथकाने मोठी कारवाई करत विविध पेढे उत्पादन करणाऱ्या फॅक्टरी (Pedha Manufacturing Factories) तसेच मिठाई विक्रीच्या दुकानांवर धाड टाकली. या कारवाईदरम्यान संशयित व निकृष्ट दर्जाचा हजारो किलो खाद्यपदार्थांचा साठा जप्त (food products seized) करण्यात आला आहे.
नक्की वाचा : ढवळपुरी येथील आदिवासी जमिनीच्या हक्कासाठी तहसीलसमोर आमरण उपोषण सुरू
अन्नभेसळ पथकाची अचानक तपासणी मोहीम
मिळालेल्या माहितीनुसार, साईबाबा दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता पेढे व मिठाई उत्पादन करणाऱ्या काही आस्थापनांमध्ये अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन होत असल्याची माहिती प्रशासनाला प्राप्त झाली होती. त्यानुसार अन्नभेसळ पथकाने अचानक तपासणी मोहीम राबवून विविध ठिकाणांहून नमुने ताब्यात घेतले.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
शिर्डीतील मिठाई व्यावसायिकांमध्ये खळबळ (FDA)
या कारवाईत मोठ्या प्रमाणात पेढे, दूधजन्य पदार्थ, खाद्यतेल तसेच अन्य साहित्य जप्त करण्यात आले असून त्यांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तपासणी अहवालानंतर संबंधितांवर अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.या धाडसत्रामुळे शिर्डीतील मिठाई व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली असून भाविकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्यांविरोधात अशाच कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.



