
Future Entrepreneur : नगर : तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे? तुमच्याकडे स्टार्टअपसाठी (Startup) नवीन आणि भन्नाट आयडिया आहेत? किंवा इम्पोर्ट-एक्सपोर्ट बिझनेसमध्ये (Import-Export Business) पाऊल ठेवायचंय? या सर्व प्रश्नांची उत्तरे आणि योग्य मार्गदर्शन आता एकाच छताखाली मिळणार आहे.
अहिल्यानगरमधील भावी उद्योजकांसाठी (Future Entrepreneur) एक अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) च्या CA अहिल्यानगर शाखेतर्फे उद्या, २७ जून २०२६ रोजी एका विशेष बिझनेस सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. या सेमिनारमध्ये प्रसिद्ध स्टार्टअप आणि MSME मेंटोर CA पंकज दारा (CA Pankaj Dara) हे उपस्थितांना सखोल मार्गदर्शन करणार आहेत.
सेमिनारमध्ये काय शिकायला मिळेल?
MSME बद्दल संपूर्ण माहिती : सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांची नोंदणी आणि त्यासंबंधीचे नियम.
इम्पॉर्ट-एक्सपोर्ट बिझनेस : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत व्यापार कसा सुरू करावा याचे सखोल मार्गदर्शन.
सरकारी योजनांचा लाभ : नवउद्योजकांसाठी असलेल्या विविध शासकीय योजना आणि सबसिडीची माहिती.
स्टार्टअप फंडिंगची संधी : जर तुमच्याकडे उत्तम बिझनेस आयडिया असेल, तर त्या स्टार्टअपसाठी आवश्यक असणारी गुंतवणूक (Investment) मिळवून देण्याबाबतही येथे मार्गदर्शन केले जाईल.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
अगदी मोफत प्रवेश, पण रजिस्ट्रेशन अनिवार्य! (Future Entrepreneur)
विशेष म्हणजे हा सेमिनार सर्वांसाठी अगदी मोफत आहे. शून्य पातळीपासून ते एक यशस्वी उद्योजक होण्यापर्यंतचा संपूर्ण रोडमॅप या सेमिनारमध्ये समजून घेता येईल.सेमिनारसाठी जागा मर्यादित असल्यामुळे पूर्व-नोंदणी (Registration) करणे आवश्यक आहे. आपली सीट निश्चित करण्यासाठी त्वरित दिलेल्या अधिकृत क्रमांकावर संपर्क साधा किंवा खालील लिंकवर क्लिक करून फॉर्म भरा. अहिल्यानगरमधील तरुण आणि नवउद्योजकांनी या सुवर्णसंधीचा नक्की लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
https://forms.gle/83MMMRgi7ZY72xog6
पत्ता – अहिल्यानगर शाखा ICAI भवन, नक्षत्र लॉन्स समोर, बुरुडगाव रोड, अहिल्यानगर.
मोबाईल नंबर – 9319547806


