Manwat Tragedy: धार्मिक स्थळी आता सुरक्षा निर्बंध लागू ;मानवत मधील दुर्घटनेनंतर राज्य सरकारचा निर्णय

0
Manwat Tragedy : धार्मिक स्थळी आता सुरक्षा निर्बंध लागू ;मानवत मधील दुर्घटनेनंतर राज्यसरकारचा निर्णय
Manwat Tragedy : धार्मिक स्थळी आता सुरक्षा निर्बंध लागू ;मानवत मधील दुर्घटनेनंतर राज्यसरकारचा निर्णय

Manwat Tragedy: परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील (Manwat Tragedy)यशवाडी या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी मंदिरासमोरील गाभाऱ्याचे छत कोसळून झालेल्या अपघातात (Accident) काही भाविकांचा मृत्यू (Death of devotees) झाल्याची घटना शनिवारी २० जूनला घडली होती. या अपघातात अनेक भाविक जखमी सुद्धा झाले. या घटनेनंतर आता राज्यशासन ॲक्शन मोडवर आलं आहे. यासंर्दभात ज्या परभणीत ही घटना घडली, तेथील जिल्हाधिकारी यांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने मोठे पाऊल टाकत धार्मिक स्थळी सुरक्षा निर्बंध लागू (Security restrictions imposed at religious places) करण्याचा निर्णय घेतलाय. हे निर्बंध काय आहेत ते पाहू…

नक्की वाचा : संजय दिना पाटील यांची सत्तेत गेल्यानंतर दोनच दिवसात दमदाटी, पत्रकारांना धमकी देत केली शिवीगाळ

कोणतेही धार्मिक स्थापत्य स्थळ, सभा मंडप व सार्वजनिक वापराच्या इमारतींचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर सक्षम अभियंत्यांकडून त्याचे स्थैर्य प्रमाणपत्र म्हणजेच (स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी सर्टिफिकेट) मिळाल्याशिवाय त्या ठिकाणी कोणालाही प्रवेश देऊ नये, असे निर्बंध परभणीचे जिल्हाधिकारी संजय चव्हाण यांनी लागू केले आहेत.

अवश्य वाचा : नसरापूर अत्याचार प्रकरणात कोर्टात काय घडलं? आरोपीला फाशी की जन्मठेप?

निर्बंध कोणते? (Manwat Tragedy)

१ –  देवस्थाने, मंदिरे, मशीद, चर्च, गुरुद्वारा, बुद्ध विहार, मठ अथवा इतर धार्मिक स्थळांवर नवीन बांधकाम, दुरुस्ती, विस्तारकाम, जीर्णोद्धार, छत दुरुस्ती, सभा मंडप उभारणी अथवा कोणत्याही प्रकारचे बांधकाम जर सुरू असेल तर त्यावेळी  सर्वसामान्य नागरिकांना याठिकाणी  दर्शन, वास्तव्य अथवा प्रवेश यावर बंदी राहील.

२ – ज्या ठिकाणी हे बांधकाम सुरु असेल अशा संबंधित ठिकाणी प्रवेश निषिद्ध असल्याचा स्पष्ट फलक लावावा.

३ – सर्व तहसीलदारांनी आपापल्या तालुक्यांतील सर्व धार्मिक स्थळांची यादी तयार करून १५ दिवसांत स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण करावे.

४ – स्ट्रक्चरल ऑडिटचा जोपर्यंत अहवाल मिळत नाही तोपर्यंत अशा ठिकाणी गर्दी होणारे कार्यक्रम, यात्रा, उत्सव, धार्मिक सोहळे हे  प्रशासनाच्या पूर्वपरवानगीनेच आयोजित करावेत.

५-  स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये असुरक्षित घोषित झालेल्या इमारती या त्वरित रिकाम्या कराव्यात व त्या सार्वजनिक वापरासाठी त्या बंद करण्यात याव्यात.

६ – १०० हून अधिक व्यक्ती एकत्र येणाऱ्या ठिकाणी गर्दी व्यवस्थापन योजना, प्रवेश व निर्गमन मार्ग, आपत्कालीन बाहेर पडण्याचे मार्ग, स्वयंसेवकांची नियुक्ती, सार्वजनिक उद्घोषणा प्रणाली अनिवार्य राहील.

७ – देवस्थान ट्रस्ट, व्यवस्थापन समिती अथवा संबंधित संस्था यांना सभा मंडपांची नियमित देखभाल, दुरुस्ती, गंजरोधक उपाययोजना, छत व खांबांची तपासणी करणे हे बंधनकारक राहील.

८ – सर्व धार्मिक स्थळांवरील अनधिकृत वायरिंग काढून टाकावे, अर्थिंगची तपासणी करावी, लोड चाचणी करावी, शॉर्टसर्किट प्रतिबंधक साधने बसवावीत, विद्युत निरीक्षकांकडून तपासणी करून घ्यावी.

असे सगळे निर्बंध राज्यातील सर्व धार्मिक स्थळांसाठी भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने लागू करण्यात आले आहेत. मानवत तालुक्यातील घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने धार्मिक स्थळांच्या सुरक्षिततेबाबत कठोर पावले उचलली आहेत. भविष्यात अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला. या सूचनांचे उल्लंघन झाल्यास संबंधित व्यवस्थापन समिती, ट्रस्ट अथवा बांधकाम संस्था यांना झालेल्या दुर्घटनेस जबाबदार धरण्यात येईल व त्यांच्याविरुद्ध कारवाई केली जाईल,असे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

मांढर देवीला नेमकं काय घडलं? (Manwat Tragedy)

पूर्वी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील वाईजवळ असलेल्या मांढर देवी मंदिरात २५ जानेवारी २००५ रोजी शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी भीषण चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली होती. या दुर्घटेनत ३४० भाविकांचा मृत्यू झाला होता आणि अनेक जण गंभीर जखमी झाले होते. या हृदयद्रावक घटनेनंतर प्रशासनाने यात्रेचे नियोजन आपल्या हातात घेतले आहे. या मोठ्या अपघातापूर्वी गडावर गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी किंवा अंधश्रद्धा रोखण्यासाठी प्रशासनाची कोणतीही विशेष यंत्रणा नव्हती. या दुर्घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता, ज्यामुळे प्रशासनाला मोठे आणि कायमस्वरूपी बदल करावे लागले. आता परभणीत झालेल्या या दुर्घटनेनंतर राज्यशासनाने भाविकांचे हित आणि सुरक्षितता लक्षात घेत धार्मिक स्थळी सुरक्षा निर्बंध लागू करण्याचा हा निर्णय घेतलाय.