
Open Dangerous Drainage : नगर : अहिल्यानगर शहरातील रस्त्यावर अनेक ठिकाणी उघडे पडलेले ड्रेनेज (Open Dangerous Drainage) नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी गंभीर धोका ठरत आहे. या मार्गावर दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहनांची तसेच पादचाऱ्यांची वर्दळ असते. मात्र ड्रेनेजवरील झाकणे तुटल्याने अपघात (Accident) होण्याची शक्यता आहे. कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वी महापालिका प्रशासनाने (AMC) या उघड्या ड्रेनेजची तातडीने दुरुस्ती करून सुरक्षित झाकणे बसवावीत, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

गंभीर अपघात घडण्याची भीती
अहिल्यानगर शहरातील बालिकाश्रम रस्त्यावर दुचाकीस्वार, शाळकरी विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्यांना या उघड्या ड्रेनेजमुळे मोठा धोका निर्माण झाला आहे. पावसाळ्यात पाणी साचल्याने उघडे ड्रेनेज नजरेस न पडल्यास गंभीर अपघात घडण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
त्वरित उपाययोजना करण्याची मागणी (Open Dangerous Drainage)
स्थानिक नागरिकांनी याबाबत अनेक वेळा संबंधित प्रशासनाचे लक्ष वेधले असले, तरी अद्याप आवश्यक ती दुरुस्ती करण्यात आलेली नाही. कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वी महापालिका प्रशासनाने या उघड्या ड्रेनेजची तातडीने दुरुस्ती करून सुरक्षित झाकणे बसवावीत, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षाही नागरिकांनी व्यक्त केली आहे.


