MLA Sangram Jagtap : नगर : आमदार संग्राम जगताप (MLA Sangram Jagtap) यांनी अचूक नेम साधणाऱ्या धनुर्धारी श्रीरामांची (Shriram) प्रतिमा बेग यांना देऊन ‘हिंदू रक्षा हेच आमचे लक्ष’ असा सूचक इशारा दिला आहे. हिंद धर्म रक्षणासाठी कायम बरोबर असल्याचा संदेशही यावेळी आमदार जगताप व सागर बेग (Sagar Beg) यांनी एकमेकांची गळाभेट घेऊन दिला.
धनुर्धारी श्रीरामांची प्रतिमा देऊन केले अभीष्टचिंतन
आमदार संग्राम जगताप यांनी हिंदुत्ववादी नेते सागर बेग यांचा सत्कार करून व धनुर्धारी श्रीरामांची प्रतिमा देऊन अभीष्टचिंतन केले. यावेळी माजी उपमहापौर गणेश भोसले, राष्ट्रवादी कॉंग्रसचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, नगरसेवक प्रकाश भागानगरे व सागर मुर्तुडकर आदींसह पदाधिकारी व कार्यकते उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी श्रीरामांच्या व छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयजयकाराच्या जोरदार घोषणा दिल्या.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
आमदार संग्राम जगताप म्हणाले, (MLA Sangram Jagtap)
हिंदू धर्मासाठी नि:स्वार्थपणे काम करणारे प्रखर हिंदुत्ववादी नेते सागर बेग यांचे कार्य उत्कृष्ट आहे. अनेक हिंदुत्ववादी आंदोलनात ते मला साथ देत आहेत. आजच्या परिस्थितीत जिहादी शक्ती विरोधात हिंदूंना जागृत करण्यासाठी मोलाचे योगदान सागर बेग देत आहेत. त्यांनी हे कार्य असेच कायम चालू ठेवावे, असे जगताप यांनी म्हटले.
सागर बेग म्हणाले, (MLA Sangram Jagtap)
महाराष्ट्रात कोठेही हिंदू धर्मीयांवर जेव्हा जेव्हा अन्याय होतो तेव्हा तेव्हा अहिल्यानगरचे हिंदुत्ववादी आमदार संग्राम जगताप धाऊन जात आहेत. हिंदू धर्म रक्षणासाठी काम करणारे आ.संग्राम जगताप यांचे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या हस्ते झालेला सत्कार अधिक प्रेरणा व उर्जा देणारा आहे.
यावेळी संतोष ढाकणे, सुरज कोतकर, सचिन पवार, प्रशांत हातरुणकर, सागर गुंजाळ, मुळ गाडळकर, ऋषी ताठे, राहुल सांगळे, रवी नामदे, पप्पू जासूद, किरण पिसोरे, राहुल बोरुडे, अनिकेत चव्हाण व संदीप लांडे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.



