Cleaning : नागापूर- बोल्हेगाव परिसराची साफसफाई; नागरिकांनी मानले नगरसेवकांचे आभार

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम

0
Cleaning : नागापूर- बोल्हेगाव परिसराची साफसफाई; नागरिकांनी मानले नगरसेवकांचे आभार
Cleaning : नागापूर- बोल्हेगाव परिसराची साफसफाई; नागरिकांनी मानले नगरसेवकांचे आभार

Cleaning : नगर : शहरातील नागापूर- बोल्हेगाव (Nagapur-Bolhegaon) येथील प्रभाग क्रमांक ८ मधील काकासाहेब म्हस्के कॉलेज (Kakasaheb Mhaske College) रस्त्यावरील राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आरोग्य केंद्रासमोरील तसेच परिसरातील गवत व काटेरी झाडे-झुडपांची महापालिकेमार्फत साफसफाई (Cleaning) करण्यात आली असून येथील आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी व परिसरातील नागरिकांनी नगरसेवक बाबूशेठ नागरगोजे व महापालिकेचे आभार मानले आहे.

नक्की वाचा : लग्नाचे आमिष दाखवून हॉटेल व्यावसायिकाची अडीच लाखांची फसवणूक; पाच जणांविरुद्ध तक्रार दाखल

Cleaning : नागापूर- बोल्हेगाव परिसराची साफसफाई; नागरिकांनी मानले नगरसेवकांचे आभार
Cleaning : नागापूर- बोल्हेगाव परिसराची साफसफाई; नागरिकांनी मानले नगरसेवकांचे आभार

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम

शहरातील प्रभाग क्रमांक ८ मधील नागापूर- बोल्हेगाव येथील काकासाहेब म्हस्के कॉलेज रस्त्यावरील राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आरोग्य केंद्रात उद्या (ता. २८) पासून राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम सुरू होणार असून ० ते ५ वयोगटातील सर्व बालकांना पोलिओ डोस देण्यात येणार आहे, त्या पार्श्वभूमीवर येथील स्थानिक नगरसेवकांनी परिसराची पाहणी केली असता आरोग्य केंद्रात परिसरात मोठ्या प्रमाणावर गवत व काटेरी झाडे-झुडपे वाढल्याचे निदर्शनास आले.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

Cleaning : नागापूर- बोल्हेगाव परिसराची साफसफाई; नागरिकांनी मानले नगरसेवकांचे आभार
Cleaning : नागापूर- बोल्हेगाव परिसराची साफसफाई; नागरिकांनी मानले नगरसेवकांचे आभार

नागरगोजे यांची महापालिकेकडे तक्रार

याबाबत नगरसेवक बाबूशेठ नागरगोजे यांनी महापालिकेकडे तक्रार केली असता परिसरातील वाढलेल्या गवत, काटेरी झाडी-झुडपांची साफसफाई करण्याची मागणी केली. पालिकेने त्यांच्या तक्रारीची दखल घेत या परिसराची साफसफाई केली आणि हे आरोग्यकेंद्र वापरण्यायोग्य करून दिले असून आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी व नागरिकांनी नगरसेवक बाबूशेठ नागरगोजे व महापालिकेचे आभार मानले आहे.