Fraud : राहाता : तालुक्यातील एका हॉटेल व्यावसायिकाला लग्न (Marriage) लावून देण्याचे आमिष दाखवत तब्बल दोन लाख ५० हजार रुपयांची फसवणूक (Fraud) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पुन्हा एकदा मंगल अंकुश पठारे, (रा.साकुरी शिव, ता. राहाता) यांचे नाव समोर आले त्याचबरोबर तिचे साथीदार भिवा भिमा माळी, (रा. पुणतांबा), मुलीचा मामा खंडू, (पूर्ण नाव माहित नाही), नवरी मुलगी राणी सुखदेव पवार, मुलीची मामी संगीता खंडू दाते, लताबाई विश्वनाथ पवार (रा.लोणी), सोनाली (पूर्ण नाव नाही), या पाच जणांविरुद्ध राहाता पोलीस ठाण्यात (Rahata Police Station) तक्रार दाखल करण्यात आली आहे.
नक्की वाचा : अहिल्यानगर उपजिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून सुनील गाढे यांची नियुक्ती
अनेक नागरिकांची अशाच प्रकारे फसवणूक करत असल्याचा संशय
तक्रारीनुसार, संशयितांनी पीडित व्यक्तीचा विश्वास संपादन करून विवाह ठरवून देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर विवाहाच्या नावाखाली टप्प्याटप्प्याने रोख रक्कम स्वीकारली. विवाहानंतर काही दिवसांतच संबंधित महिला घरातून निघून गेल्याने फसवणूक झाल्याचे पीडिताच्या लक्षात आले. तसेच, ही टोळी अनेक नागरिकांची अशाच प्रकारे फसवणूक करत असल्याचा संशयही तक्रारीत व्यक्त करण्यात आला आहे. या आधीच मुख्य आरोपी मंगल पठारे यांची रवानगी नाशिक कारागृहात करण्यात आली आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
अमोल भारती पोलीस यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई (Fraud)
या प्रकरणी राहाता पोलिसांनी तक्रार केली असून पुढील तपास अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, यांच्या आदेशाने, व शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती पोलीस यांच्या मार्गदर्शनाखाली,पोलीस निरीक्षक दीपक सरोदे हे करत आहे.



