Sunil Gadhe : अहिल्यानगर उपजिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून सुनील गाढे यांची नियुक्ती 

प्रांताधिकारी म्हणून पुणे तसेच सातारा जिल्ह्यात कामकाज

0
Sunil Gadhe : अहिल्यानगर उपजिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून सुनील गाढे यांची नियुक्ती
Sunil Gadhe : अहिल्यानगर उपजिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून सुनील गाढे यांची नियुक्ती

Sunil Gadhe : नेवासा : अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हा निवडणूक अधिकारी (Deputy District Election Officer) पदावर कार्यरत असलेलेले दत्तात्रय कवितके यांची नुकतीच अतिरिक्त जिल्हाधिकारी (Additional District Collector) पालघर या पदावर पदोन्नतीने शासनाने बदली केल्यामुळे त्यांच्या जागेवर सुनील गाढे (Sunil Gadhe) यांची उपजिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून शासनाने नियुक्ती केलेली आहे.

नक्की वाचा : वारंवार पेपर का फुटतात? आमदार सत्यजित तांबे यांचा मोठा आरोप, म्हणाले…

प्रांताधिकारी म्हणून पुणे तसेच सातारा जिल्ह्यात कामकाज

सुनील गाढे हे मूळचे अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील कनगर या गावचे रहिवासी असून त्यांनी यापूर्वी निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून वर्धा गडचिरोली, तर प्रांताधिकारी म्हणून पुणे तसेच सातारा या जिल्ह्यात कामकाज केलेले आहे. नंदुरबार जिल्ह्यात पाचोरा बारी या गावच्या पुरामुळे बाधित झालेल्या व्यक्तीच्या पुनर्वसनात तत्कालीन जिल्हाधिकारी मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या समवेत केलेल्या कामाची दखल घेऊन त्यांचा २०१६ साली उत्कृष्ट उपजिल्हाधिकारी म्हणून महसूल विभागाने गौरव केलेला आहे. 

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

उत्कृष्ट उपजिल्हाधिकारी म्हणून गौरव (Sunil Gadhe)

तसेच सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यामध्ये २०२१ मध्ये अतिवृष्टीमुळे दरड कोसळून बाधित झालेल्या नऊ गावांचे तातडीने पुनर्वसन करण्यासंदर्भात केलेल्या कार्यवाही मुळे, तसेच भूकंपग्रस्त, कुणबी दाखल्याचे वाटप रात्री कार्यालयात उशिरापर्यंत थांबून काम केले असल्याने २०२२ मध्ये त्यांना उत्कृष्ट उपजिल्हाधिकारी म्हणून गौरविण्यात आले आहे. याशिवाय त्यांना विशेष कार्य अधिकारी पदावर देखील काम करण्याचा अनुभव आहे.