MP Nilesh Lanke : खासदार निलेश लंके शिवसेनेत आल्यास स्वागतच; आमची दारे कायम खुली : संजीव भोर

MP Nilesh Lanke : खासदार निलेश लंके शिवसेनेत आल्यास स्वागतच; आमची दारे कायम खुली : संजीव भोर

0
MP Nilesh Lanke : खासदार निलेश लंके शिवसेनेत आल्यास स्वागतच; आमची दारे कायम खुली : संजीव भोर
MP Nilesh Lanke : खासदार निलेश लंके शिवसेनेत आल्यास स्वागतच; आमची दारे कायम खुली : संजीव भोर

MP Nilesh Lanke : नगर : अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके (MP Nilesh Lanke) यांच्या संभाव्य शिवसेना (Shiv Sena) प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले असून, शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते संजीव भोर (Sanjeev Bhor) यांनी यासंदर्भात मोठे विधान केले आहे. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी, निलेश लंके हे मूळचे शिवसैनिक आहेत. त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला तर त्यांचे आम्ही निश्चित स्वागत करू असे स्पष्ट केले.

नेता आयुष्यभर एकाच पक्षात राहील असे चित्र नाही

आजच्या राजकारणात कोणताही नेता आयुष्यभर एकाच पक्षात राहील असे चित्र उरलेले नाही राजकारणात संपर्क आणि संवाद कायम सुरू असतो, असे सांगताना भोर म्हणाले की, सर्वच पक्षांचे नेते आणि पदाधिकारी एकमेकांच्या संपर्कात असतात. काही जण शेवटपर्यंत ठाम भूमिका घेतात, तर काहींच्या राजकीय हालचाली आणि चर्चा सुरू असतात. त्यामुळे कोण कोणत्या पक्षात जाईल याबाबत आधीच निश्चितपणे सांगता येत नाही. आजच्या राजकारणात कोणताही नेता आयुष्यभर एकाच पक्षात राहील असे चित्र उरलेले नाही. हीच सध्याची राजकीय वास्तवता आहे, असेही त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट सांगितले

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

निलेश लंके हे मूळचे शिवसैनिक (MP Nilesh Lanke)

खासदार निलेश लंके हे मूळचे शिवसैनिक, पक्षात आले तर आम्ही नक्कीच त्यांचा स्वागत करू. खासदार निलेश लंके यांच्याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, लंके हे पूर्वीपासून शिवसेनेशी जोडलेले असून त्यांचे अनेक शिवसेना नेत्यांशी जुने संबंध आहेत. पक्ष वेगळे असले तरी वैयक्तिक संपर्क कधीच तुटत नसतात.शिवसेना शिंदे गटाची भूमिका स्पष्ट करताना भोर म्हणाले, शिवसेनेत येऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक इच्छुकाचे आम्ही शंभर टक्के स्वागत करू. मग ते शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीतून असोत, काँग्रेसमधून असोत किंवा इतर कोणत्याही पक्षातून असोत. आमची दारे सर्वांसाठी खुली आहेत, कारण ते सर्व आमचीच माणसे आहेत.संजीव भोर यांच्या या वक्तव्यामुळे अहिल्यानगरच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली असून, आगामी काळात खासदार निलेश लंके यांच्या राजकीय भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.