Farm Loan Waiver | पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा राज्यातील ५६ लाख शेतकऱ्यांना लाभ

0

Farm Loan Waiver | नगर : राज्य शासनाने जाहीर केलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत थेट कर्जमुक्ती (Farm Loan Waiver), नियमित कर्जफेड करणाऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ व दोन लाखांवरील कर्जासाठी एकवेळ समझोत्याची सुविधा देण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या इतिहासातील ही सर्वात मोठी कर्जमुक्ती योजना असून राज्यातील सुमारे ५६ लाख शेतकऱ्यांना तिचा लाभ मिळणार आहे.

पुनर्गठित व फेरपुनर्गठित कर्जांचाही या योजनेत समावेश करण्यात आला असून संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन व पारदर्शक ठेवण्यात आली आहे. आधार प्रमाणीकरण अनिवार्य करण्यात आले आहे.

हे वाचा – खासदार निलेश लंके शिवसेनेत आल्यास स्वागतच; आमची दारे कायम खुली : संजीव भोर

शेतीसाठी आर्थिक संधी उपलब्ध (Farm Loan Waiver)

हवामान बदल, अनियमित पाऊस, दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट व उत्पादन खर्चातील वाढ यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडत असल्याने ही योजना शेतकऱ्यांना नव्याने उभे करण्याच्या व्यापक दृष्टिकोनातून तयार करण्यात आली आहे. कर्जमुक्तीनंतर शेतकऱ्यांना सुधारित बियाणे, सूक्ष्म सिंचन, यांत्रिकीकरण, पीक विविधीकरण व मूल्यवर्धित शेतीसाठी आर्थिक संधी उपलब्ध होतील.

अवश्य वाचा – अहिल्यानगर जिल्ह्यातपहिले धरण भरले; मुळा नदीवरील आंबीत धरण ‘ओव्हरफ्लो’

नव्याने कर्ज घेण्याचा मार्ग मोकळा (Farm Loan Waiver)

अहिल्यानगर जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांनाही या योजनेचा मोठ्या प्रमाणावर लाभ मिळणार आहे. ऊस, कांदा, डाळिंब, द्राक्षे, कापूस, ज्वारी, हरभरा, सोयाबीन, गहू व विविध फळपिकांवर जिल्ह्याची कृषी अर्थव्यवस्था अवलंबून असून कर्जमुक्तीमुळे पात्र शेतकऱ्यांची पत पुन्हा निर्माण होऊन नव्याने कर्ज घेण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी विहिरी, तलाव, बंधारे व जलसंधारणाची कामे करून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले होते. त्यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षात त्यांच्याच नावाने जाहीर झालेली ही योजना त्यांच्या लोककल्याणकारी कार्याला खरी आदरांजली मानली जात आहे. शेतकरी सक्षम, समृद्ध व आत्मनिर्भर झाला तरच ग्रामीण महाराष्ट्र अधिक बळकट होईल, हाच या योजनेचा व्यापक उद्देश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here