UBT : उद्धव ठाकरेंकडून मुख्यमंत्री फडणवीस यांची पाठराखण तर दुसरीकडे टोलेबाजी; राहाता येथे सांगता सभा

0
UBT : उद्धव ठाकरेंकडून मुख्यमंत्री फडणवीस यांची पाठराखण तर दुसरीकडे टोलेबाजी; राहाता येथे सांगता सभा
UBT : उद्धव ठाकरेंकडून मुख्यमंत्री फडणवीस यांची पाठराखण तर दुसरीकडे टोलेबाजी; राहाता येथे सांगता सभा

UBT : राहाता : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे २०२९ मध्ये पंतप्रधान होण्याच्या रेस मध्ये आहे, आपल्या महाराष्ट्रातील पंतप्रधान होत असेल तर तो आपला अभिमान आहे असे सूचक वक्तव्य शिर्डी येथील पत्रकार परिषदेत शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी केल्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. एकमेकांचे शत्रु मानले जाणारे उद्धव ठाकरे व देवेंद्र फडणवीस पंतप्रधान पदासाठी एक होताना दिसत आहे, परंतु सभेतील टोलेबाजीमध्ये वाक्प्रचार तुम्हाला समजत नसेल तर विधानसभा अध्यक्षांकडून शिकून घ्या, विधानसभा अध्यक्षांना मराठी नीट वाचता येत नाही ते कारभार पाहता असे बोलत फडणवीस यांच्यावर टोला लगावला.

हेही वाचा : नसरापूर प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा; पुणे सत्र न्यायालयाचा निर्णय

सिद्ध संकल्प लॉन्स येथे सांगता सभा

राज्याच्या राजकारणात मुख्यमंत्र्यांना सर्व कळत आहे, परंतु सहन होत नाही आणि बोलताही येत नाही अशी अवस्था आपल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची झाली असल्याचे प्रतिपादन उद्धव ठाकरे यांनी केले. शिंदेसेनेत गेलेल्या ६ खासदारांमुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे यांची राहाता येथील सिद्ध संकल्प लॉन्स येथे जाहीर सांगता सभा झाली यावेळी ते बोलत होते, पुढे ते म्हणाले खाऊसाहेब वाकचौरे सापडला तर सोडू नका, जे होत ते चांगल्यासाठीच होत असत आणि गद्दार हे आपल्याबरोबर नकोच, वाकचौरे जास्त बोलल्यावर तुला मारतील म्हणून भाऊसाहेब वाकचौरे मला देवमाणूस म्हणतात . आमदार फुटतात, खासदार फुटतात आणि आता पेपर फुटतात यामुळे विद्यार्थ्यांचे नशीब देखील फुटत आहे.

नक्की पहा : अहिल्यानगरमधील कत्तलखान्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; ७६ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

भाऊसाहेब वाकचौरे यांच्यावर घणाघात (UBT)

मला आपल्या शिवसेनेचा पाहिजे आणि शिर्डी मतदारसंघात पुढील खासदार हा शिवसेनेचाच होणार आहे. हा खाऊसाहेब वाकचौरे साईबाबांचा देखील नैवद्य खातो , एवढा कोटीचा निधी मिळालेला असताना १३५ कामातील फक्त दोन कामे याने केली, असे बोलत फुटीर खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यावर उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघात केला. यावेळी आदित्य ठाकरे, संजय राऊत, अनिल देसाई, विनायक राऊत, जिल्हाध्यक्ष सचिन कोते उपस्थित होते.