Uddhav Thackeray : राहाता : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे २०२९ मध्ये पंतप्रधान होण्याच्या रेस मध्ये आहे, आपल्या महाराष्ट्रातील पंतप्रधान होत असेल तर तो आपला अभिमान आहे असे सूचक वक्तव्य शिर्डी येथील पत्रकार परिषदेत शिवसेना नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केल्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या, एकमेकांचे शत्रु मानले जाणारे उद्धव ठाकरे व देवेंद्र फडणवीस पंतप्रधान (Prime Minister) पदासाठी एक होताना दिसत आहे, परंतु सभेतील टोलेबाजीमध्ये वाक्प्रचार तुम्हाला समजत नसेल तर विधानसभा अध्यक्षांकडून शिकून घ्या, विधानसभा अध्यक्षांना मराठी नीट वाचता येत नाही ते कारभार पाहतात असे बोलत फडणवीस यांच्यावर टोला लगावला, याचे कारण म्हणजे मुख्यमंत्र्यांचे पंख छाटले जात आहे असे प्रतिपादन याआधी उद्धव ठाकरे यांनी केले.
वाक्प्रचाराचा अर्थ फडणवीस यांनी शिकून घेण्याची गरज
यावर फडणवीण म्हणाले मी काय पक्षी आहे का त्यामुळे या वाक्प्रचाराचा अर्थ फडणवीस यांनी शिकून घेण्याची गरज ठाकरे यांनी व्यक्त केली . राज्याच्या राजकारणात मुख्यमंत्र्यांना सर्व कळत आहे, परंतु सहन होत नाही आणि बोलताही येत नाही अशी अवस्था आपल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची झाली असल्याचे प्रतिपादन उद्धव ठाकरे यांनी केले. शिंदेसेनेत गेलेल्या ६ खासदारांमुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे यांची सोमवारी (ता. २९) राहाता येथे जाहीर सांगता सभा झाली यावेळी ते बोलत होते.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
यापुढील मुख्यमंत्री मला आपल्या शिवसेनेचा पाहिजे (Uddhav Thackeray)
पुढे ते म्हणाले खाऊसाहेब वाकचौरे सापडला तर सोडू नका, जे होत ते चांगल्यासाठीच होत असत आणि गद्दार हे आपल्याबरोबर नकोच, वाकचौरे जास्त बोलल्यावर तुला मारतील म्हणून भाऊसाहेब वाकचौरे मला देवमाणूस म्हणतात. आमदार फुटतात, खासदार फुटतात आणि आता पेपर फुटतात यामुळे विद्यार्थ्यांचे नशीब देखील फुटत आहे, काहीही झालं का फक्त जय श्रीराम, निव्वळ फक्त जय श्रीराम यांना येत. यापुढील मुख्यमंत्री मला आपल्या शिवसेनेचा पाहिजे आणि शिर्डी मतदारसंघात पुढील खासदार हा शिवसेनेचाच होणार आहे.
उद्धव ठाकरे यांचा वाकचौरे यांच्यावर घणाघात
हा खाऊसाहेब वाकचौरे साईबाबांचा देखील नैवद्य खातो , एवढा कोटीचा निधी मिळालेला असताना १३५ कामातील फक्त दोन कामे याने केली. असे बोलत फुटीर उद्धव ठाकरे यांनी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यावर घणाघात केला . शिवसेना नेते उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, अनिल देसाई, विनायक राऊत, जिल्हाध्यक्ष सचिन कोते हे नेते रात्री शिर्डी येथील एका मध्ये मुक्कामी होते, सोमवारी (ता. २९) सकाळी साडेदहा वाजता त्यांनी साईदर्शन घेतले, त्यानंतर हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेण्यात आली व नंतर राहाता येथे जाहीर सभा झाली, यावेळी प्रवेश होत असताना मोठा हार घालत त्यांचे यावेळी जल्लोषात स्वागत करण्यात आले .



