E-Crop Survey | ८०० सहायक करणार यंदा ई-पीक पाहणी; सातबारा उताऱ्यावरील नोंदी होणार सुलभ

0

E-Crop Survey | नगर : शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर पिकांची नोंद करण्यासाठी शेतकऱ्यांना यापुढे स्वतः ई-पीक (E-Crop Survey) पाहणी करावी लागणार नाही. गेल्या काही वर्षात ई-पीक पाहणी प्रक्रियेला मिळालेला अल्प प्रतिसाद आणि शेतकऱ्यांसमोरील तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन राज्य सरकारने यंदापासून पीक नोंदणीची जबाबदारी नियुक्त सहायकांकडे सोपविण्याचा निर्णय घेतला आहे.

हे वाचा – केडगावात तलवार बाळगून दहशत करणारा जेरबंद; कोतवाली पोलिसांची कारवाई

मोबाईल अॅपच्या माध्यमातून स्वतःच्या शेतातील पिकांची नोंद

राज्यभर ही मोहीम १५ जुलैपासून सुरू होणार आहे. अहिल्या नगर जिल्ह्यात ई-पीक पाहणीसाठी ८०० सहायकांची नेमणूक करण्यात येणार आहे. साधारण १ हजार ते दीड हजार प्लॉटसाठी एक या प्रमाणे सहायक यांची नेमणूक करण्यात येणार आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांना मोबाईल अॅपच्या माध्यमातून स्वतःच्या शेतातील पिकांची नोंद करावी लागत होती. मात्र, अनेक ठिकाणी ही प्रक्रिया प्रभावीपणे राबवली जात नसल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे प्रत्यक्ष क्षेत्रात जाऊन माहिती संकलित करण्यासाठी सहायकांची नियुक्ती केली जाणार आहे. यामुळे सातबारा उताऱ्यावरील पीक नोंदी अधिक अचूक होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सातबारा उताऱ्यावर प्रत्यक्ष घेतलेल्या पिकांची डिजिटल नोंद करण्याची शासनाची प्रक्रिया म्हणजे ई-पीक पाहणी. यामध्ये पीक, क्षेत्रफळ आणि लागवडीची माहिती ऑनलाईन नोंदवली जाते. शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी, पिकांनुसार कर्ज घेण्यासाठी आणि पीकविमा क्लेम करण्यासाठी सातबारावर नोंद असणे आवश्यक असते.

नक्की वाचा : डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी महाविद्यालयाला महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून ‘अ’ दर्जा

पीक माहिती संकलित

पूर्वी शेतकऱ्यांना स्वतः नोंदणी करताना सव्र्व्हर डाऊन असणे, नेटवर्क न मिळणे आणि अॅप हँग होणे अशा तांत्रिक अडचणी येत होत्या. नवीन नियमांनुसार पीक पाहणीची अचूकता तपासण्यासाठी अंतराची मर्यादा निश्चित करण्यात आली. नियुक्त सहायकांना संबंधित शेतात किंवा शेताच्या हद्दीपासून म्हणजे २० मीटरच्या आत उभे राहूनच पिकाचे फोटो काढावे लागणार आहेत. नियुक्त सहायक प्रत्यक्ष शेतात जाऊन पीक माहिती संकलित करणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना अॅप हाताळण्याची गरज राहणार नाही. मोहीम वेगाने पूर्ण करण्यासाठी महिला बचत गटांच्या सदस्यांनाही प्रशिक्षण देऊन कामात सहभागी केले जाणार आहे. यामुळे ही प्रक्रिया आता अधिक सुलभ होणार आहे. अॅग्रीस्टॅकशी संलग्न, मोबाईलवर मेसेज पीक पाहणीची माहिती थेट अॅग्रीस्टॅक प्रणालीशी संलग्न राहणार असून, नोंदणी पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना ई-पीक पाहणीची माहिती मेसेजद्वारे मिळणार आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

अहिल्यानगर जिल्ह्यात १४ तालुके असून या ठिकाणी साधारणपणे ८०० साहाय्यकांची नेमणूक करण्यात येणार आहे. प्रत्येक गावातील एक हजार ते दीड हजार प्लॉटसाठी एक या प्रमाणे साहाय्ययक यांची नेमणूक करण्याच्या हालचाली सुरू आहेत.

राज्य सरकारच्या आदेशानुसार नगर जिल्ह्यात ई-पीक पाहणीसाठी साहयकांची नेमणूक करण्यात येणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात या सहायकांच्या नेमणुकीची प्रक्रिया सुरू असून साधारणपणे ८०० साहयकांची नेमणूक करण्यात येणार आहे. प्रत्येक गावातील एक हजार ते दीड हजार प्लॉटसाठी एक या प्रमाणे साहयक यांची नेमणूक राहणार आहे.

  • – शारदा जाधव, उपजिल्हाधिकारी, महसूल, अहिल्यानगर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here