The Angry Birds Movie 3 : ‘द ॲंग्री बर्ड्स मूव्ही ३’ मध्ये ‘रेड’समोर उभे ठाकले आहे आतापर्यंतचे सर्वात मोठे आव्हान; चित्रपट १ जानेवारी २०२७ रोजी होणार प्रदर्शित

The Angry Birds Movie 3

0
The Angry Birds Movie 3 : 'द ॲंग्री बर्ड्स मूव्ही ३' मध्ये 'रेड'समोर उभे ठाकले आहे आतापर्यंतचे सर्वात मोठे आव्हान; चित्रपट १ जानेवारी २०२७ रोजी होणार प्रदर्शित
The Angry Birds Movie 3 : 'द ॲंग्री बर्ड्स मूव्ही ३' मध्ये 'रेड'समोर उभे ठाकले आहे आतापर्यंतचे सर्वात मोठे आव्हान; चित्रपट १ जानेवारी २०२७ रोजी होणार प्रदर्शित

The Angry Birds Movie 3 : पॅरामाउंट पिक्चर्सने (Paramount Pictures) ‘द ॲंग्री बर्ड्स मूव्ही ३’चा (The Angry Birds Movie 3) अधिकृत ट्रेलर, पोस्टर आणि ‘फर्स्ट लूक’ची छायाचित्रे सादर केली आहेत, ज्यातून या ब्लॉकबस्टर ॲनिमेटेड फ्रँचायझीच्या पुढील भागाची झलक पाहायला मिळते. ‘रेड’ने यापूर्वी हिरव्या डुकरांशी (Green Pigs) लढा दिला आहे आणि ‘बर्ड आयलंड’ला वाचवले आहे, परंतु त्याचे आतापर्यंतचे सर्वात मोठे आव्हान हे केवळ आणखी एक साहस नसून ‘पालकत्व’ हे आहे.

नवीन कौटुंबिक पैलू सादर

या फ्रँचायझीची वैशिष्ट्यपूर्ण विनोदबुद्धी, भावनिक पैलू आणि जबरदस्त ॲक्शनने परिपूर्ण असलेला ‘द ॲंग्री बर्ड्स मूव्ही ३’ एक नवीन कौटुंबिक पैलू सादर करतो, जो ‘रेड’ला एका अनोख्या परिस्थितीत घेऊन जातो. पालकत्वाच्या धावपळीत आणि गोंधळात मार्गक्रमण करत असतानाच, त्याला जगाला वाचवण्याच्या मोहिमेवरही जावे लागते. यातून हे सिद्ध होते की, युद्धभूमीवर नायक असणे जितके आव्हानात्मक असते, तितकेच घरी ‘नायक’ (किंवा जबाबदार पालक) असणेही कठीण असू शकते.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

अनेक दिग्गज कलाकारांनी दिला आवाज (The Angry Birds Movie 3)

जॉन कोहेन, डॅन चुबा, कार्ला कॉनर आणि नमित मल्होत्रा ​​यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे, तर थुरोप व्हॅन ओर्मन यांच्या पटकथेवर आधारित याचे दिग्दर्शन जॉन राइस यांनी केले आहे.

या चित्रपटात जेसन सुडेकिस, जोश गॅड, एमा मायर्स, रॅचेल ब्लूम, वॉकर स्कोबेल, डॅनी मॅकब्राइड, मार्सेलो हर्नांडेझ, टिम रॉबिन्सन, ॲना कॅथकार्ट, मैत्रेयी रामकृष्णन, निक्की ग्लेझर, मिस्टरबीस्ट, सालिश मॅटर, साल्म वेस्ट, सॅम रिचर्डसन आणि जेम्स ऑस्टिन जॉन्सन, तसेच लिली जेम्स आणि केके पामर यांसारख्या अनेक दिग्गज कलाकारांनी आवाज दिला आहे.

पिसे, कुटुंब आणि भरपूर मज्जा-मस्तीसाठी सज्ज व्हा, कारण ‘द ॲंग्री बर्ड्स मूव्ही ३’ हा चित्रपट १ जानेवारी २०२७ रोजी भारतात इंग्रजी आणि हिंदी भाषेत केवळ चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे.