concreting Work : नगर : राज्य शासनाच्या माध्यमातून अहिल्यानगर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला असून त्या निधीतून शहरात सांडपाणी व्यवस्था, रस्ता काँक्रिटीकरण (concreting Work), पायाभूत सुविधा आणि विविध विकासकामांना गती मिळाली आहे. नियोजनबद्ध आणि कायमस्वरूपी विकासकामांमुळे नागरिकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध होत असून शहराचा चेहरा-मोहरा बदलत आहे. विकसित शहराची ओळख निर्माण करण्यासाठी महापालिका (Municipal Corporation) आणि लोकप्रतिनिधी सातत्याने प्रयत्नशील आहेत. विकासकामांच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न सोडविणे हेच आमचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी केले.
नक्की वाचा : नसरापूर प्रकरणाचा निकाल हा न्यायव्यवस्थेवरील विश्वास वाढवणारा : आमदार खताळ
राज पॅलेस हॉटेल परिसरातील रस्ता अत्यंत खराब
मनपा प्रभाग क्रमांक १३च्या नगरसेविका सुजाता पडोळे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे टिळक रोड येथील राज पॅलेस हॉटेल परिसरातील रस्ता काँक्रिटीकरण कामासाठी निधी उपलब्ध झाला. या महत्त्वपूर्ण विकासकामाचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाले. यावेळी नगरसेविका सुजाता पडोळे म्हणाल्या की, आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक १३ मधील चारही नगरसेवकांना नागरिकांनी विश्वासाने निवडून दिले. त्या विश्वासाला पात्र ठरत प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. नियोजनबद्ध पद्धतीने एक-एक विकासकाम हाती घेऊन ते पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. टिळक रोड येथील राज पॅलेस हॉटेल परिसरातील रस्ता अत्यंत खराब झाला होता. या रस्त्याचे काँक्रिटीकरण व्हावे यासाठी आमदार संग्राम जगताप यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
सर्व कामांसाठी संग्राम जगताप यांचे महत्त्वपूर्ण योगदान (concreting Work)
त्यांच्या माध्यमातून मोठा निधी उपलब्ध झाल्याने आता या परिसरात दर्जेदार आणि कायमस्वरूपी रस्त्याचे काम मार्गी लागणार आहे. नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांसह विकासकामांना प्राधान्य देत समस्यामुक्त प्रभाग निर्माण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे त्यांनी सांगितले. स्थायी समितीचे माजी सभापती अविनाश घुले यांनी प्रभाग क्रमांक १३ मध्ये झालेल्या विविध विकासकामांचा आढावा घेत या सर्व कामांसाठी आमदार संग्राम जगताप यांचे महत्त्वपूर्ण योगदान लाभल्याचे सांगितले. त्यांनी आगामी काळातही प्रभागाच्या विकासासाठी अशाच प्रकारे कामे सुरू राहतील, असा विश्वास व्यक्त केला.कार्यक्रमाच्या शेवटी गोरख पडोळे यांनी उपस्थित मान्यवर, नागरिक आणि सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले. परिसरातील नागरिकांनी रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामाचे स्वागत करत लोकप्रतिनिधींच्या विकासाभिमुख भूमिकेचे कौतुक केले.
नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित
यावेळी स्थायी समितीचे माजी सभापती अविनाश घुले, नगरसेवक सुरेश बनसोडे, माजी नगरसेवक विपुल शेटीया, गोरख पडोळे, कांतीशेठ पटेल, जेठाशेठ पटेल, नरसीशेठ पटेल, पुरुषोत्तम पटेल, परेश दिवाणी, तुषार मुथा, रितेश सोनी मंडेचा, राजेंद्र एकाडे, विजय गांधी, राजू कानडे, संजय जोशी, रवी जाधव, सुरेश जाधव, बाळासाहेब शिंगवी, शरद ओके, अतुल जाधव, राकेश गांधी, शंकर पटेल, वैभव पटेल, वैभव जगताप, गोविंद सुनील ताठे, संतोष टेके, नंदू एकाडे, दिलीप जाधव, देवा जाधव, रमाकांत पाडळे, सोमा कानडे, विजय फुगारे, अभिजीत आवटी, निकुंज छेडा, केतन गुंदेचा, बाबू पाचरणे, राजाभाऊ ससे, अर्जुन बोरुडे, इंजि. गणेश गाडळकर, अमृत पटेल, अंबादास चौधरी, रमेश कोरडे, गणेश पालवे, संदेश मुनोत, हितेश मेहता, मनीष फुलडहाळे आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



