Agricultural Damage : अकोले : तालुक्यातील वीरगाव येथे एका शेतकऱ्याच्या कांदा चाळीत अज्ञात व्यक्तीने यूरिया टाकून मोठे नुकसान केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. हा प्रकार मंगळवारी (ता. ३० जून) सकाळी साडेनऊ वाजता उघडकीस आला.
हेही वाचा : कोपरगाव नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर यांचे जात प्रमाणपत्र रद्द
अज्ञात व्यक्तीने टाकला यूरिया
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वीरगाव येथील ६८ वर्षीय शेतकरी दत्तात्रय शंकर वाकचौरे सोमवारी (ता. २९) रात्री साडेआठच्या सुमारास गावातील एका अंत्यविधीसाठी गेले होते. याच वेळेचा फायदा घेत अज्ञात व्यक्तीने त्यांच्या घराजवळील कांदा चाळीत यूरिया टाकला. सकाळी चाळीची पाहणी करण्यासाठी गेल्यावर दत्तात्रय वाकचौरे यांना हा प्रकार लक्षात आला.
नक्की पहा : मंत्री भुसे यांचे वाहन युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अडवले
मोठे आर्थिक नुकसान (Agricultural Damage)
या घटनेमुळे शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. दत्तात्रय वाकचौरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून अकोले पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. शेतकऱ्यांच्या मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी गावातील नागरिकांनी सतर्क राहावे आणि संशयास्पद व्यक्ती किंवा घटना दिसल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.



