Karjat Police : भावकीतील वादाचा सूड घेण्यासाठी वकील संघटनेच्या प्रभावाचा गैरफायदा घातल्याचा आरोप 

स्वतंत्र गुन्हा दाखल करण्याची मागणी

0
Karjat Police : भावकीतील वादाचा सूड घेण्यासाठी वकील संघटनेच्या प्रभावाचा गैरफायदा घातल्याचा आरोप
Karjat Police : भावकीतील वादाचा सूड घेण्यासाठी वकील संघटनेच्या प्रभावाचा गैरफायदा घातल्याचा आरोप

Karjat Police : कर्जत : कुंभेफळ (ता.कर्जत) येथील शेतजमीनीचा वाद हा भावकीतील वाद असून यात संबंधित वकील (Lawyer) असणाऱ्या व्यक्तीने आपल्या ज्ञानाचा वापर करत वेगळ्या पद्धतीने समाजात मांडला. या घटनेची कर्जत पोलिसांनी (Karjat Police) निपक्ष आणि पारदर्शकपणे चौकशी करावी अशी मागणी कर्जत भाजपाकडून (BJP) पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. 

नक्की वाचा : बीएलओची जबाबदारी असलेल्या पाथर्डीतील प्राथमिक शिक्षिकेचा मृत्यू

महसूल विभागासमोर सुनावणी सुरू

चरपटीनाथ पांडुरंग धोदाड आणि त्यांच्या कुटुंबियांनी कुंभेफळ (ता.कर्जत) ४ मे रोजी नोंदणीकृत खरेदीखताद्वारे संबंधित जागेच्या मालकी व्यक्तीकडून कायदेशीर दृष्ट्या खरेदी केली होती. या खरेदीच्या फेरफार नोंदीसंदर्भात हरकत दाखल झाल्याने महसूल विभागासमोर सुनावणी देखील सुरू आहे. मात्र पूर्वीपासून जमिनीच्या बांधावरून ॲड संदीप शिवदास पाटील व चरपटीनाथ धोदाड यांच्यात भावकीतील वाद असल्याने या वादाचा सूड घेण्यासाठी संदीप पाटील यांनी वकील संघटनेच्या प्रभावाचा गैरफायदा घेत धोदाड कुटुंबीयांवर खोटे, बनावट व सूडबुद्धीने प्रेरित गुन्हे दाखल केल्याचा गंभीर आरोप भाजपा पदाधिकाऱ्यांनी निवेदनात केला. 

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

स्वतंत्र गुन्हा दाखल करण्याची मागणी (Karjat Police)

या घटनेत चरपटीनाथ उर्फ पप्पू पांडुरंग धोदाड व त्यांच्या कुटुंबीयांवरील खोट्या गुन्ह्यांची कर्जत पोलिसांनी सखोल चौकशी करावी. तसेच गुन्ह्यात तथ्य न आढळल्यास समोरील व्यक्तीवर खोटा गुन्हा दाखल केला म्हणून स्वतंत्र गुन्हा दाखल करण्याची मागणी मंगळवारी (ता.३०) रोजी कर्जत भाजपाने निवेदनाद्वारे कर्जतचे पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांच्याकडे केली. वास्तविक पाहता ॲड संदीप पाटील यांनी चरपटीनाथ धोदाड यांच्या गळ्याभोवती फास आवळून जीवे मारण्याचा प्रत्यक्ष प्रयत्न केला. त्यांच्यावर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करीत आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी केली.