
SIR : नगर : भारत निवडणूक आयोगाच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम अंतर्गत ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) घरोघरी भेट देऊन गणना प्रपत्र वितरित करून ते भरून घेणार आहेत. नागरिकांनी आवश्यक माहिती देऊन या प्रक्रियेस सहकार्य करावे, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केले.
हेही वाचा : ३५ फूट उंच झाडावर लटकलेल्या कावळ्याची थरारक सुटका; अमित गायकवाड यांचे धाडस
यांची नियुक्ती
यावेळी नायब तहसीलदार सुधीर उबाळे, नायब तहसीलदार कैलास साळुंखे आदी उपस्थित होते.
पाटील म्हणाले की, २२५ अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघात एकूण ३ लाख १५ हजार २६४ मतदार असून २ लाख २४ हजार ४५२ मतदारांचे मॅपिंग पूर्ण करण्यात आले आहे. मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षणासाठी एकूण २९७ बीएलओ कार्यरत असून ३० पर्यवेक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना सहाय्य करण्यासाठी ४ सहायक मतदार नोंदणी अधिकारी आणि ३६ नव्याने सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.
नक्की पहा : ६ लाख प्रामाणिक शिक्षकांच्या भविष्याशी खेळ! TET पेपर चक्क प्रिंटिंग प्रेसमधूनच लीक?
सहकार्याचे आवाहन (SIR)
बीएलओंना मदतनिस म्हणून आशा सेविका व अंगणवाडी सेविकांचीही नियुक्ती करण्यात आली असून सर्व बीएलओंना २५ जून रोजी प्रशिक्षण देण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुरळीत होण्यासाठी विविध राजकीय पक्षांच्या ६३१ मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी (बीएलए) यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचे प्रशिक्षण ३० जून रोजी घेण्यात आले. बीएलओ घरी भेट देण्यासाठी आल्यानंतर नागरिकांनी आवश्यक कागदपत्रे व माहिती उपलब्ध करून देत सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.


