
Local Crime Branch : श्रीगोंदा : स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने श्रीगोंदा पोलीस ठाणे हद्दीत कारवाई करत अलिशान कारमधून होणारी प्रतिबंधित गुटख्याची अवैध वाहतूक (Illegal transport of Gutkha) उघडकीस आणली आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल २८ लाख ८८ हजार ३३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून तीन आरोपींना रंगेहात ताब्यात (Accused apprehended red-handed) घेतले तर चार जण पसार झाले आहेत.
नक्की वाचा : भावकीतील वादाचा सूड घेण्यासाठी वकील संघटनेच्या प्रभावाचा गैरफायदा घातल्याचा आरोप
गुन्हा दाखल
अमोल रामदास जाधव (वय ३५), अनिल रतन कुरुमकर (वय ४३, दोघे रा. मुंढेकरवाडी, ता. श्रीगोंदा) आणि फरहान रेहमान बेपारी (वय २३, रा. बुरुडगल्ली, ता. श्रीगोंदा) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार मनोज मोहन साखरे यांच्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास श्रीगोंदा पोलीस करीत आहेत. अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याचे आदेश दिले आहेत.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
सुगंधित तंबाखू विक्रीसाठी आणली असल्याची माहिती (Local Crime Branch)
या आदेशान्वये श्रीगोंदा परिसरात पेट्रोलिंग करत असताना, मुंढेकरवाडी येथे अमोल जाधव याने शरीरास अपायकारक आणि प्रतिबंधित असलेला गुटखा व सुगंधित तंबाखू विक्रीसाठी आणला असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीवरून २९ जून रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्य पथकाने तातडीने मुंढेकरवाडी येथे अमोल जाधव याच्या घराच्या परिसरात जाऊन खात्री केली. तिथे पांढऱ्या रंगाच्या कारमधून काही गोण्या स्विफ्ट कारमध्ये भरल्या जात असल्याचे दिसले. पोलिसांनी घटनास्थळावरून अमोल रामदास जाधव, अनिल रतन कुरुमकर, आणि फरहान रेहमान बेपारी यांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता, हा व्यवसाय अमोल जाधव आणि दीपक लोखंडे (रा. लोखंडेवाडी, पसार) हे भागीदारीत चालवत असल्याचे समोर आले.
मुद्देमाल जप्त
हा माल त्यांनी जत (जि. सांगली) येथील अप्पू आणि माजिद (दोघे पसार) यांच्याकडून खरेदी केला होता, तर फरहान बेपारी हा शोयेब राजू तांबोळी (रा. बुरुडगल्ली, पसार) याच्या सांगण्यावरून माल विक्रीसाठी घेऊन जात होता. या कारवाईत पोलिसांनी ६ लाख ०३ हजार २०० रुपये किमतीचा पान मसाला व सुगंधित तंबाखू, २२ लाख रुपये किमतीच्या दोन चारचाकी वाहने, ३० हजार १३० रुपये रोख आणि ५५ हजार रुपये किमतीचे ४ मोबाईल असा एकूण २८ लाख ८८ हजार ३३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी अनंत सालगुडे आणि त्यांच्या पथकाने केली आहे.


