Radhakrishna Vikhe : पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांची ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शिका विजया मेहता यांना श्रद्धांजली

0
Radhakrishna Vikhe : पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांची ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शिका विजया मेहता यांना श्रद्धांजली
Radhakrishna Vikhe : पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांची ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शिका विजया मेहता यांना श्रद्धांजली

Radhakrishna Vikhe : नगर : मराठी रंगभूमीला नवी दृष्टी, कलात्मक उंची आणि प्रयोगशीलतेची नवी परंपरा देणाऱ्या ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शिका विजया मेहता यांच्या निधनाची बातमी अत्यंत वेदनादायी आहे. त्यांच्या निधनाने मराठी नाट्यविश्वाने एक तेजस्वी, दूरदर्शी आणि प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्त्व गमावल्याची भावना जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.

हेही वाचा : ऑनलाइन बिंगो जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

शोकसंदेश

आपल्या शोकसंदेशात डॉ. विखे पाटील म्हणाले की, अपार प्रतिभा, सखोल अभ्यास आणि रंगभूमीवरील अटल कलानिष्ठा यांच्या बळावर विजया मेहता यांनी मराठी रंगभूमीला राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिष्ठेची नवी उंची प्राप्त करून दिली. त्यांच्या दिग्दर्शनामुळे नाटक हे केवळ मनोरंजनाचे माध्यम न राहता आशयाची सखोलता, भावनांची ताकद आणि कलात्मक परिपूर्णता यांचा प्रभावी अनुभव देणारे माध्यम बनले.

नक्की पहा : चिमुरड्याचा प्रशासकीय आणि खाजगी बेजबाबदारपणामुळे गेला जीव!

भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी कार्य (Radhakrishna Vikhe)

मेहता यांनी घडविलेली कलाकारांची पिढी, रुजविलेली नावीन्यपूर्ण परंपरा आणि जपलेली कलामूल्ये हा मराठी रंगभूमीचा अमूल्य वारसा आहे. त्यांचा जीवनप्रवास तसेच सर्जनशील कार्य भावी पिढ्यांसाठी कायम प्रेरणादायी राहील, अशा शब्दांत डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शिका विजया मेहता यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.