Police raid on a gambling den : ऑनलाइन बिंगो जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Police raid on a gambling den : ऑनलाइन बिंगो जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

0

Police raid on a gambling den : नगर : स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने ऑनलाइन बिंगो जुगार अड्ड्यावर छापा (Police raid on a gambling den) टाकून चौघांना पकडले. त्यांच्याविरूध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात (Ahilyanagar Taluka Police Station) गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत रोख रक्कम, एलईडी टीव्ही, संगणक संच, मोबाईल फोन व इतर साहित्य असा एकूण ८० हजार २०० रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

गुन्हा दाखल झालेल्यांची नावे

सागर गंगाधर शिंदे (वय ३२, रा. गोपाळ वस्ती, सोलापूर बायपास, अहिल्यानगर), विलास शांताराम गुजर (वय ३०, रा. खंडाळा, ता. अहिल्यानगर), शिवाजी पंजरकर, गौतम साळवे (दोघे, रा. आरणगाव, ता. अहिल्यानगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. अहिल्यानगर – दौंड रस्त्यावर आरणगाव शिवारात एका पत्र्याच्या शेडमध्ये ऑनलाइन बिंगो जुगार सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना मिळाली होती. त्यांनी एक पथक तयार करून छापा टाकण्याचे आदेश दिले.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

८० हजार २०० रूपयांचा मुद्देमाल जप्त(Police raid on a gambling den)

त्यानुसार दौंड रस्त्यालगत नायरा पेट्रोल पंपाशेजारी अरणगाव शिवारातील पत्र्याच्या शेडमध्ये पथकाने छापा टाकला. यावेळी चौघे पकडले. ते बिंगो नावाच्या ऑनलाइन हारजीतीच्या जुगार खेळत असताना आढळून आले. त्यांना ताब्यात घेण्यात आले. छाप्यात एक हजार ४०० रूपये रोख रक्कम, ४० हजार किमतीचा एलईडी टीव्ही, आठ हजार रूपये किमतीचा सीपीयू व केबल्स, दोन मोबाईल व इतर साहित्य असा ८० हजार २०० रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस अंमलदार मनोज साखरे यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.