Anna Hazare : माहितीचा अधिकार कायद्यातील बदलांना स्थगिती, अण्णांच्या इशाऱ्यामुळे सरकारचे नमते

Anna Hazare : माहितीचा अधिकार कायद्यातील बदलांना स्थगिती, अण्णांच्या इशाऱ्यामुळे सरकारचे नमते

0
Anna Hazare : माहितीचा अधिकार कायद्यातील बदलांना स्थगिती, अण्णांच्या इशाऱ्यामुळे सरकारचे नमते
Anna Hazare : माहितीचा अधिकार कायद्यातील बदलांना स्थगिती, अण्णांच्या इशाऱ्यामुळे सरकारचे नमते

Anna Hazare : नगर : माहितीचा अधिकार कायद्याच्या (Right to Information Act) नियमांत करण्यात आलेल्या बदलांना आता स्थगिती देण्यात आली आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी याविरोधात 5 जुलैपासून राळेगणसिद्धीत आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Devendra Fadnavis) यांनी राज्य माहिती आयोगाला पत्र पाठवून या दुरूस्त्या तूर्त लागू करू नयेत, अशी विनंती केली असून आयोगाने दुरूस्त्यांना स्थगिती दिली आहे. त्यामुळे हजारे यांचे आंदोलनही स्थगित केले जाऊ शकते. मात्र, त्याची अधिकृत घोषणा अद्याप बाकी आहे.

बदलांना अनेक संघटनांचा विरोध

माहितीचा अधिकार कायद्याच्या नियमात काही बदल करण्यात आले होते. 12 जून रोजी ही अधिसूना प्रसिद्ध झाली. सुधारित नियमांनुसार माहिती अधिकार अर्जाचे शुल्क १० रुपयांवरून ३० रुपये करण्यात आले असून माहितीच्या प्रतींसाठी प्रतिपान शुल्क २ रुपयांवरून ५ रुपये करण्यात आले आहे. याशिवाय प्रथम अपीलसाठी ५० रुपये आणि द्वितीय अपीलसाठी १०० रुपये शुल्क आकारण्याची तरतूद करण्यात आली आहे. या बदलांना अनेक संघटनांनी विरोध केला.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

हजारे राहिले हाेते आंदोलनावर ठाम (Anna Hazare)

त्यानंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही याला विरोध करीत आंदोलनाचा इशारा दिला. राज्याचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी राऴेगणसिद्धीत येऊन हजारे यांची भेट घेतली. मात्र, यातून तोडगा निघाला नाही. त्यामुळे हजारे आंदोलनावर ठाम राहिले. त्यांनी सरकारला स्मरणपत्रही पाठविले. त्याचेही उत्तर आले नाही.


त्यामुळे आंदोलनाची तयारी सुरू करण्यात आली. हजारे यांची पुण्यात आजच आरोग्य तपासणी करून घेण्यात आली. हजारे यांना पाठिंबा देण्यासाठी उद्या (3 जून) राळेणसिद्धीच्या ग्रामस्थांनी आंदोलनही पुकारले होते. त्यानंतर आत सरकारने या बदलांना स्थगिती दिली आहे. त्यामुळे राळेगणसिद्धीत समाधानाचे वातावरण आहे.