Gang War : श्रीरामपुरात भरदिवसा तरुणावर धारदार हत्याराने वार; गँगवारचा भडका उडाल्याची चर्चा

गोळीबाराच्या चर्चेला प्रशासनाने दुजोरा दिला नाही

0
Gang War : श्रीरामपुरात भरदिवसा तरुणावर धारदार हत्याराने वार; गँगवारचा भडका उडाल्याची चर्चा
Gang War : श्रीरामपुरात भरदिवसा तरुणावर धारदार हत्याराने वार; गँगवारचा भडका उडाल्याची चर्चा

Gang War : श्रीरामपूर : शहरातील पूर्णवाद नगर भागामध्ये शुभम यादव उर्फ कल्लू नावाच्या तरुणावर काही जणांनी पाठीवर व पोटावर धारदार हत्याराने वार (Struck with a sharp weapon) करून गंभीर जखमी (Seriously injured) केल्याची घटना घडली आहे. आज (ता.२) दुपारच्या सुमारास ही घटना घडली. 

नक्की वाचा : आशा स्वयंसेविकेच्या पतीमुळे वाचले चिमुरडीचे प्राण; श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथील घटना

गोळीबाराच्या चर्चेला प्रशासनाने दुजोरा दिला नाही

या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाला पुढील उपचारासाठी अहिल्यानगर येथे हलवण्यात आले आहे. दरम्यान, या हल्ल्यात गोळीबार झाल्याची चर्चा आहे. परंतू त्यास प्रशासनाने दुजोरा दिला नाही. दरम्यान तरुणावर झालेल्या या जीवघेण्या हल्ल्याच्या घटनेने श्रीरामपूरात पुन्हा एकदा गॅंगवॉरचा भडका उडाल्याची चर्चा सुरू झाली आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

पोलिसांची तत्काळ घटनास्थळी धाव (Gang War)

मागील काही दिवसांपासून शहरात सर्रासपणे घडणाऱ्या गुन्हेगारीच्या घटनांवरून श्रीरामपूर शहर परिसरात टोळीयुद्धाला सुरुवात झाल्याची चर्चा नागरिकांत सुरू झाली आहे. संबंधित तरुणावर झालेला हा हल्ला अशाच एका जुन्या वादातून घडल्याचे बोलले जात आहे. दरम्यान भरदिवसा शहरात गोळीबार झाल्याची घटना पोलिसांना समजताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. या घटनेमुळे शहरामध्ये दहशतीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.