Gunfire : मुरुम वाहतुकीच्या वादातून घरात घुसून गोळीबार; मालुंजे येथील घटना

जिवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला

0
Gunfire : मुरुम वाहतुकीच्या वादातून घरात घुसून गोळीबार; मालुंजे येथील घटना
Gunfire : मुरुम वाहतुकीच्या वादातून घरात घुसून गोळीबार; मालुंजे येथील घटना

Gunfire : संगमनेर : तालुक्यातील मालुंजे (गोसावी फाटा) येथे मुरुम वाहतुकीच्या वादातून एका शेतकर्‍याच्या घरात घुसून दोन जणांनी पिस्तुलातून गोळ्या झाडून (Gunfire) जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात इतर आरोपींनी तलवारीने घराचे दरवाजे आणि खिडक्यांची तोडफोड (Vandalism of doors and windows) करून परिसरात दहशत निर्माण केली. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात (Sangamner Taluka Police Station) सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नक्की वाचा : श्रीरामपुरात भरदिवसा तरुणावर धारदार हत्याराने वार; गँगवारचा भडका उडाल्याची चर्चा

तीन अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल

या संदर्भात संदीप भाऊसाहेब घुगे (वय ४३, रा. मालुंजे, गोसावी फाटा, मातोश्री निवास, ता. संगमनेर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार विशाल होशीराम खेमनर (रा. अंभोरे), प्रवीण ठकाजी पुणेकर (रा. डिग्रस) आणि सुदर्शन शिवाजी श्रीराम (रा. डिग्रस, ता. संगमनेर) यांच्यासह इतर तीन अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

जिवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला (Gunfire)

याबाबत तालुका पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी संदीप घुगे हे बुधवार (ता. १) रात्री १० वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घरी होते. जुन्या मुरुम वाहतुकीच्या वादाची कुरापत काढून वरील सर्व आरोपी दोन मोटार सायकलींवरून फिर्यादी यांच्या घरासमोर आले. त्यांनी घरात घुसून घुगे यांना जिवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला चढवला. यावेळी आरोपी विशाल होशीराम खेमनर आणि प्रवीण ठकाजी पुणेकर या दोघांनी हातातील पिस्तुल काढून थेट संदीप घुगे यांच्या दिशेने गोळीबार केला. 

आरोपी घटनास्थळावरून पसार

सुदैवाने या गोळीबारातून घुगे बचावले. याच दरम्यान सुदर्शन श्रीराम व त्याच्यासोबत असलेल्या इतर तीन अनोळखी इसमांनी हातातील तलवारीने घुगे यांच्या घराच्या दरवाजावर आणि खिडक्यांवर वार करत जोरदार तोडफोड केली. परिसरात मोठमोठ्याने आरडाओरडा करत शिवीगाळ व जिवे मारण्याची दमदाटी करून आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात एकच खळबळ उडाली. रात्री ११ वाजेच्या सुमारास माहिती मिळताच अवघ्या काही मिनिटांत पोलीस यंत्रणा सतर्क झाली.

सोनवणे यांची घटनास्थळी भेट

संगमनेर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे आणि पोलीस उपनिरीक्षक महेश शिंदे हे पथकासह घटनास्थळी पोहोचले. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांनी तातडीने घटनास्थळाला भेट दिली. याप्रकरणी फिर्यादी संदीप घुगे यांच्या तक्रारीवरून संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. वरील सहा जणांवर जिवे मारण्याचा प्रयत्न आणि बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे स्वतः करत आहेत.