Recruitment : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत विविध पदांची कंत्राटी भरती; १५ जुलैपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

0
Recruitment : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत विविध पदांची कंत्राटी भरती; १५ जुलैपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन
Recruitment : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत विविध पदांची कंत्राटी भरती; १५ जुलैपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

Recruitment : नगर : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, अहिल्यानगर यांच्या अधिपत्याखालील माजी सैनिकांच्या पाल्यांचे वसतिगृह, कोपरगाव, माजी सैनिक विश्रामगृह, श्रीगोंदा तसेच महासैनिक लॉन येथे विविध पदांवर कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती करण्यात येणार आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी दि. १५ जुलै २०२६ पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी वि. ल. कोरडे यांनी केले आहे.

हेही पहा : स्मार्ट मीटरच्या नावाखाली नागरिकांची लूट: बाळासाहेब बोराटे यांचा गंभीर आरोप

या पदांसाठी भरती

या भरतीअंतर्गत सहायक वसतिगृह अधीक्षक, सहायक व्यवस्थापक, चौकीदार, स्वयंपाकी, माळी आणि सफाई कामगार या पदांसाठी नियुक्ती करण्यात येणार आहे. या पदांसाठी नागरी उमेदवारही अर्ज करू शकतात. मात्र, माजी सैनिकांना प्राधान्य दिले जाईल. उमेदवार व्यसनमुक्त असणे आवश्यक असून चौकीदाराचे पद निवासी स्वरूपाचे आहे.

नक्की वाचा : माहितीचा अधिकार कायद्यातील बदलांना स्थगिती, अण्णांच्या इशाऱ्यामुळे सरकारचे नमते

जाणून घ्या प्रक्रिया (Recruitment)

इच्छुक माजी सैनिक उमेदवारांनी अर्जासोबत सैन्य सेवेतील डिस्चार्ज बुक, माजी सैनिक ओळखपत्र यांच्या छायांकित प्रती जोडाव्यात. सर्व उमेदवारांनी आधार कार्डाची छायांकित प्रतही अर्जासोबत सादर करावी. उमेदवाराचे वय ४५ वर्षांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. विहित मुदतीत प्राप्त अर्जांची छाननी करून पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी स्वतंत्रपणे कळविण्यात येईल.