Bhandardara Dam : अकोले : उत्तर नगर जिल्ह्याला वरदान लाभलेल्या भंडारदरा धरणाच्या (Bhandardara Dam) पाणलोट क्षेत्रामध्ये सलग तिसऱ्या दिवशी जोरदार पाऊस (Heavy rain) कोसळत असल्याने धरणामध्ये २५१ दलघफू नवीन पाण्याची आवक (Inflow of new water into the dam) झाली आहे. गुरुवारी दिवसभर पाणलोटासह परिसराला पावसाने अक्षरशः झोडपून काढले.
नक्की वाचा : माहितीचा अधिकार कायद्यातील बदलांना स्थगिती, अण्णांच्या इशाऱ्यामुळे सरकारचे नमते
शेतकऱ्यांना भात लागवडीचे लागले वेध
या पावसाने आता कळसुबाईचे क्षेत्रही प्रभावित झाले असून कृष्णावंती नदीही वाहती झाल्याने वाकी धरणामध्ये पाण्याची आवक सुरू झाली आहे. घाटघर, रतनवाडी, साम्रद परिसरात धुक्याने चादर पसरली असून सर्वत्र सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरलेले दिसून येत आहे. सतत पडत असलेल्या पावसामुळे आता आदिवासी शेतकऱ्यांना भात लागवडीचे वेध लागले आहेत. घाटघर, साम्रद, रतनवाडी परिसरात धुळ वाफा पेरणी बऱ्याच शेतकऱ्यांनी केले होती. त्यामुळे तेथील शेतकरी मोठ्या पावसाची वाट पाहत होते.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
साम्रद येथील रिव्हर्स धबधबा जोरदार वाहता (Bhandardara Dam)
दरम्यान, भंडारदरा धरणाच्या पाणलोटात जोरदार पाऊस कोसळत असल्याने वसुंधरा धबधबा, नेकलेस फॉल, कोलटेंभे धबधबा, साम्रद येथील रिव्हर्स धबधबा जोरदार वाहत असून पर्यटकांसाठी ही पर्वणी ठरणार आहे.



