
Case registered against women : नगर : अहिल्यानगर पोलीस अधीक्षक कार्यालयावर (Ahilyanagar Superintendent of Police Office) मोर्चा काढून जिल्ह्यात लागू असलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केले. तसेच विनापरवाना जाहीर घोषणाबाजी व प्रतिमेचे प्रदर्शन केल्याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात (Bhingar Camp Police Station) पाच महिलांसह २० ते ३० अनोळखी महिलांविरूध्द गुन्हा दाखल (Case registered against women) करण्यात आला आहे.
यांच्याविराेधात गुन्हा दाखल
पोलीस अंमलदार अजय गव्हाणे यांनी फिर्याद दिली आहे. माजी नगरसेविका शेख नसीम खानसाहेब, शेख मुन्नी अयाज, शेख निदा जावेद, शेख सुमय्या झाकिर, आयशा खान व इतर २० ते ३० अनोळखी महिलांविरूध्द हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
नाझिया इलाही विरूध्द गुन्हा नाेंदवण्याची केली हाेती मागणी (Case registered against women)
सोशल मीडियाच्या माध्यमातून धार्मिक भावना दुखावणारी अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्ये केल्याप्रकरणी कोलकत्याच्या नाझिया इलाही खान यांच्याविरूध्द तातडीने गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शहरातील महिलांनी केली आहे. या मागणीसाठी बुधवारी (ता.१) सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास अधीक्षक कार्यालय येथे संबंधित महिलांनी एकत्र येत नाझिया इलाही खान यांच्या प्रतिमेचे विनापरवाना प्रदर्शन केले आणि जाहीर घोषणाबाजी केली.
जिल्हा पोलीस दरम्यान, जिल्हाधिकारी यांनी १९ जून रोजी काढलेल्या आदेशानुसार २ जुलै रोजी रात्री १२ वाजेपर्यंत जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू होते. या आदेशाचे उल्लंघन केल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


