Mula Dam : नगर : मुळा धरणाच्या (Mula Dam) पाणलोटात पाऊस पडत असल्याने अकोले तालुक्यातील पिंपळगाव खांड धरण (Pimpalgaon Khand Dam) भरले आहे. अकोले तालुक्यातील भरलेले हे दुसरे धरण आहे. त्यामुळे आता मुळा धरणात पाणी येण्याला सुरवात झाली आहे. पिंपळगाव खांड भरल्यानंतर प्रवाहीत झालेल्या मुळा नदीचे (Mula River) पाणी शनिवारी (ता. ४) रात्रीपर्यत मुळात धरणात पोहचेल. मुळात पाण्याची आवक सुरु झाल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
मुळा धरणात सध्या २८.७० टक्के पाणीसाठा
अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात पडणाऱ्या पावसाकडे शेतकऱी, नागरिकांसह प्रशासनाचे लक्ष असते. मुळा धरणाच्या पाणलोटातील हरिश्चंद्र गड, पाचनई, आंबित भागात पाऊस सुरू असल्याने मुळा नदीचा प्रवाह काहीसा वाढला. हे पाणी पिंपळगाव खांड या धरणात येत आहे. ६०० दलघफू क्षमतेचे हे धरण शुक्रवारी (ता. ३) रात्री आठ वाजता भरले. याआधी या नदीवरील आंबीत धरण भरलेले आहे. आता पाणलोटातील पावसाचे पाणी थेट मुळा धरणात येत आहे. मुळा धरणात सध्या साडेसहा टीएमसी पाणी असून २८.७० टक्के पाणीसाठा आहे. नवीन पाणी आवक सुरु झाल्याने पाणीसाठा वाढण्यास मदत होणार आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
पाणलोटात मान्सून सक्रिय झाल्याने कमी-अधिक पाऊस (Mula Dam)
गत आठ दिवसांपासून पाणलोटात मान्सून सक्रिय झाल्याने कमी अधिक पाऊस कोसळत आहे. भंडारदरा येथे अनेक नयनरम्य स्थळे आहेत. निसर्गसौंदर्याने नटलेले स्थान असून अनेक धबधबे सक्रिय झाले आहेत. डोंगररांगा धुक्याने लपेटून गेल्या आहेत. हिरवी झाडे, शुद्ध आणि थंड हवा हे इथल्या मूळच्या सौंदर्यात भर टाकू लागले आहे. हेच खुललेले सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांना आता हा परिसर खुणवू लागला आहे.



