Telegram : नगर : प्रसिद्ध मेसेजिंग ॲप ‘टेलिग्राम’ पुन्हा एकदा केंद्र सरकारच्या निशाण्यावर आले आहे. चित्रपट आणि वेबसीरिजची पायरसी रोखण्यासाठी टेलिग्रामला नोटिसद्वारे १५ दिवसांची मुदत दिली आहे. या १५ दिवसांच्या आत पायरसी रोखण्यासाठी काय उपाययोजना केल्या, याचा सविस्तर ‘ॲक्शन टेकन रिपोर्ट’ सरकार दरबारी सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
हेही वाचा : रॉड तुटल्याने स्कूल बस पलटी; १५ ते २० विद्यार्थिनी किरकोळ जखमी
१५ दिवसांची मुदत
केंद्र सरकारने या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन टेलिग्रामला १५ दिवसांची मुदत दिली आहे. या १५ दिवसांच्या आत पायरसी रोखण्यासाठी काय उपाययोजना केल्या, याचा सविस्तर ‘ॲक्शन टेकन रिपोर्ट’ सरकार दरबारी सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. टेलिग्रामवरील विविध चॅनेल्स आणि ग्रुप्सच्या माध्यमातून नवनवीन चित्रपट आणि वेब सीरिज विनामूल्य आणि बेकायदेशीरपणे युजर्सपर्यंत पोहोचवल्या जातात, यावर तातडीने आळा घालण्यास सांगण्यात आले आहे.
नक्की पहा : कोपरगाव तालुक्यात गांजाची शेती; सुरेगावातून गांजाची झाडे जप्त
डिजिटल मनोरंजन क्षेत्राचे नुकसान (Telegram)
डिजिटल क्षेत्रातील पायरसीमुळे भारतीय चित्रपट उद्योग आणि डिजिटल मनोरंजन क्षेत्राचे अब्जावधी रुपयांचे नुकसान होत आहे. नवीन चित्रपट किंवा वेब सीरिज रिलीज झाल्यानंतर काही तासांतच त्याचे पायरेटेड व्हर्जन टेलिग्रामवर उपलब्ध होते. या पायरसीमुळे चित्रपट निर्माते, ब्रॉडकास्टर्स, ओटीटी प्लॅटफॉर्म्स, वितरक आणि कलाकार यांच्या हक्कांचे मोठे उल्लंघन होत आहे. देशातील ‘क्रिएटर इकॉनॉमी’ सुरक्षित ठेवण्यासाठी आणि चित्रपट सृष्टीतील संबंधितांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी सरकारने हे कठोर पाऊल उचलल्याचे नोटीसमध्ये म्हटले आहे.



