Accident : राहुरी : शहरातील भागीरथीबाई कन्या शाळेच्या विद्यार्थिनींना घेऊन जाणाऱ्या स्कूल बसचा (School bus) रॉड तुटल्याने बस पलटी झाली. आज (ता.३) सायंकाळी राहुरी स्टेशन परिसरात हा अपघात (Accident) घडला. या अपघातात १५ ते २० विद्यार्थिनी किरकोळ जखमी (Injured) झाल्या असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. त्यामुळे मोठी दुर्घटना थोडक्यात टळली.
नक्की वाचा : सोमठाणे नलवडे येथे गाडीला कट मारल्याच्या कारणावरून जीवघेणा हल्ला; महिलांसह १२ जण जखमी
बस पलटी होऊन रस्त्याच्या सहा ते सात फूट खाली
मिळालेल्या माहितीनुसार, शाळा सुटल्यानंतर भागीरथीबाई कन्या शाळेची स्कूल बस विद्यार्थिनींना तांदुळवाडी, कोंढवड व शिलेगाव या भागात सोडवण्यासाठी निघाली होती. राहुरी स्टेशन परिसरातील एका खड्ड्याजवळून बस जात असताना अचानक बसचा रॉड तुटला आणि बसचा तोल जाऊन ती पलटी झाली. अपघाताच्या ठिकाणी साईडपट्टी नसल्यामुळे बस पलटी होऊन रस्त्याच्या सहा ते सात फूट खाली आली. अपघाताच्यावेळी बसमध्ये सुमारे ३० ते ४० विद्यार्थिनी परतीचा प्रवास करीत होत्या. त्यापैकी १५ ते २० विद्यार्थिनींना किरकोळ दुखापत झाली.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
सर्व विद्यार्थिनींची प्रकृती स्थिर (Accident)
अपघात होताच परिसरातील नागरिक आणि विद्यार्थिनींच्या पालकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमी विद्यार्थिनींना त्वरित राहुरी शहरातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, सर्व विद्यार्थिनींची प्रकृती स्थिर असून त्यांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत. या घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, स्कूल बसच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. या अपघाताचे नेमके कारण काय, बसचा रॉड कशामुळे तुटला आणि वाहनाची नियमित तपासणी करण्यात आली होती का, याबाबत संबंधित यंत्रणेकडून चौकशी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



