Gavathi Katta : बोधेगाव येथे गावठी कट्टा बाळणारा जेरबंद;  दोन जिवंत काडतुसांसह एक मॅगझीन हस्तगत

२० हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

0
Gavathi Katta : बोधेगाव येथे गावठी कट्टा बाळणारा जेरबंद; दोन जिवंत काडतुसांसह एक मॅगझीन हस्तगत
Gavathi Katta : बोधेगाव येथे गावठी कट्टा बाळणारा जेरबंद; दोन जिवंत काडतुसांसह एक मॅगझीन हस्तगत

Gavathi Katta : शेवगाव : शेवगाव पोलिसांनी (Shevgaon Police) शनिवारी (ता. 4) अवैध शस्त्रास्त्रांविरोधातील मोहिमेत महत्त्वाची कारवाई करत बोधेगाव येथून एक गावठी कट्टा (Gavathi Katta), दोन जिवंत काडतुसे आणि एक मॅगझीन असा एकूण २० हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. या प्रकरणी एका आरोपीला अटक करून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल (Filed a case) करण्यात आला आहे. शाकीर बशीर शेख (वय ३४, रा. बोधेगाव, ता. शेवगाव, जि. अहिल्यानगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

नक्की वाचा : तमनर आखाडा येथील व्यवसायीकाच्या घरी चोरी; तीन लाख रुपयांचा ऐवज लंपास

संशयित व्यक्तीची पंचांसमक्ष अंगझडती

पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांना गोपनीय माहिती मिळाली की, बोधेगाव-हातगाव मार्गावरील हॉटेल अमरप्रीत परिसरात एक व्यक्ती गावठी कट्टा बाळगून फिरत आहे. या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक बाजीराव सानप यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने मध्यरात्री छापा टाकला. कारवाईदरम्यान हॉटेल परिसरात संशयित व्यक्तीची पंचांसमक्ष अंगझडती घेण्यात आली. त्यावेळी पोलिसांनी त्याच्याकडून एक देशी बनावटीचा गावठी कट्टा, एक स्टीलचे मॅगझीन आणि दोन जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आले. संबंधित व्यक्तीकडे शस्त्र बाळगण्याचा कोणताही वैध परवाना नसल्याचे चौकशीत स्पष्ट झाले.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

२० हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत (Gavathi Katta)

त्याच्याकडून २० हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा, ५०० रुपये किमतीचे मॅगझीन आणि १०० रुपये किमतीची दोन जिवंत काडतुसे असा एकूण २० हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल शाम गुंजाळ यांच्या फिर्यादीवरून शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बाजीराव सानप करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक बाजीराव सानप व त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली