Forest Department : कर्जत : कापरेवाडी (ता.कर्जत) मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेतर्गत ग्रामपंचायत (Gram Panchayat) हद्दीतील शिंदेवाडी शिवारात सुरू असलेल्या कामाला वनविभागाच्या (Forest Department) कारवाईमुळे लाखों रुपयांचा फटका बसला असून सौर ऊर्जा प्रकल्पासाठी (Solar power projects) उभारण्यात आलेले विजेचे तब्बल २७ खांब वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी जेसीबीच्या साहाय्याने पाडले. शासकीय मालमत्तेचे नुकसान यासह अधिकाऱ्यांनी कोणतीही पूर्व सूचना न देता आपल्या पदाचा गैरवापर केला असल्याची माहिती संबंधित ठेकेदारांनी दिली.
नक्की वाचा : बोधेगाव येथे गावठी कट्टा बाळणारा जेरबंद; दोन जिवंत काडतुसांसह एक मॅगझीन हस्तगत
विद्युत वाहिनी पाडून त्याची मोडतोड
शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीजपुरवठा देण्यासाठी महाजनको आणि महावितरणमार्फत कर्जत परिसरात सौर कृषी वाहिनीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मंजूर आराखड्यानुसार कापरेवाडी-शिंदेवाडी शिवारात ३३ केव्ही वीज वाहिनीचे खांब उभारण्याचे काम सुरू होते. ही जमीन खाजगी मालकीची असून त्याची तोंडी संमती घेण्यात आली होती. तसेच या कामासाठी ग्रामपंचायतीची लेखी परवानगी घेतल्याचा दावा महावितरणसह संबंधित शेतकऱ्यांनी केला. मात्र ११ जून रोजी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कोणतीही सक्षम प्राधिकरणाची परवानगी किंवा कायदेशीर अधिकार नसताना जेसीबीच्या साह्याने ही विद्युत वाहिनी पाडून त्याची मोडतोड केल्याचे निदर्शनास आले.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
संबंधित अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस (Forest Department)
या घटनेनंतर महावितरणने तातडीने पाहणी करत शासकीय कामात अडथळा आणि मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी वन विभागाच्या रेहेकुरी येथील संबंधित अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या नोटीसमध्ये ७ दिवसांच्या आत लेखी खुलासा सादर करण्याचे आदेश दिले असून खुलासा समाधानकारक न आल्यास नुकसानभरपाई वसूल करण्याची आणि शासकीय मालमत्ता नुकसान प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई करण्याची भूमिका घेतली. हा प्रकल्प पूर्ण झाला असता तर परिसरातील शेतकऱ्यांना दिवसा हक्काची वीज मिळाली असती. मात्र वन अधिकाऱ्यांच्या कारवाईमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून, दिवसा विजेचा प्रश्न पुन्हा लांबणीवर पडल्याची संतप्त प्रतिक्रिया परिसरातील शेतकऱ्यांनी दिली.



